अजित पवार, Ajit Pawar ,NCP Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेत अजित दादांची ताकद वाढली, राष्ट्रवादीला 'त्यांनी' दिला बिनशर्त पाठिंबा!

Maharashtra Assembly Election News : ऑल इंडिया जमात ए सलमानी समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

Maharashtra Elections 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. प्रत्येक पक्षाने जुळवाजुळव सुरु केली आहे. महायुतीमध्ये अजित पवार यांना जागावाटप करण्यात संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आलेय. पण आता अजित पवार यांना दिलासा दिणारी बातमी समोर आली. विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची ताकद आणखी वाढली आहे. ऑल इंडिया जमात ए सलमानी समाजाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती देण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देशभरात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. सलमानी समाजासह बंजारा समाज, कामगार वर्ग, अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहत असल्याने पक्ष अधिक सक्षम होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यापक होत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सांगितले.

घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात बुधवारी ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. जरीफ अहमद सलमानी, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. आफताब आलम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रियाज आलम सलमानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हसमत अली सलमानी, पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे, जावेद इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्थ पाठिंबा जाहीर करण्यात आला.

विकासाच्या मुद्यावर अजितदादा महायुतीसोबत गेलेले आहेत. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह आणलेले इतर अनेक उपक्रम महाराष्ट्रातील जनतेत लोकप्रियता मिळवत आहेत. त्यामुळे सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, त्याचाच कोणताही फटका महायुतीला बसणार नाही. हरियाणामध्येही अशीच वातावरण निर्मिती केली गेली. मात्र, तिथे भाजपने बहुमत मिळवले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा धीरज शर्मा यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT