नंदुरबार, तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार, तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नंदुरबार - हतनूर धरणाच्या Hatnur Dam पाणलोट क्षेत्रात पाऊस Rain झाल्याने रात्री 10 वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 1 लाख 6 हजार 122 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याने नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील तापी Tapi नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

पुढील 24 आणि 48 तासात पाण्याची आवक लक्षात घेता पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे प्रत्येकी एक द्वार रात्री 9.30 वाजता पूर्ण क्षमतेने उघडून प्रकल्पातून अनुक्रमे 20 हजार 497 आणि 16 हजार 776 इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT