kalyan news  Saam tv
महाराष्ट्र

कल्याणमध्ये नाट्यगृहाची दुरावस्था; 'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या कलाकारांवर प्रयोग बंद करण्याची वेळ

kalyan news : कल्याणमध्ये नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. 'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या कलाकारांवर प्रयोग बंद करण्याची वेळ आली.

Saam Tv

कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकाराने तयार केला व्हिडिओ

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची कलाकारांवर आली वेळ

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि अव्यवस्था निर्माण झाली आहे. या दुरावस्थेवर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचे कलाकारांनी म्हटलंय.

कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे नाट्यगृह हे शहरातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र मानले जाते. कल्याणमध्ये विविध मराठी नाटकांचे प्रयोग नियमितपणे होत असतात. मात्र सध्या या नाट्यगृहातील सुविधांबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नाट्यगृहातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी सांगितले की, या समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लॉकडाऊननंतर नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले होते, मात्र त्या काळात नेमकी कोणती कामे झाली आणि लाखोंचा खर्च केलेला निधी कुठे गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, नाट्यगृहात वारंवार इलेक्ट्रिक स्पार्क होत असल्याने चार ते पाच वेळा प्रयोग थांबवावे लागले. त्यामुळे प्रेक्षक आणि कलाकार दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने तक्रारी केल्या जात असूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप कलाकारांनी केला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना उबाठा देखील आक्रमक झाली आहे.

ठाकरे गटाचे पदाधिकारी उमेश बोरगावकर यांनी नाट्यगृहातील एसी बंद असणे, वारंवार स्पार्क होणे यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही कलाकार आणि कल्याणकरांना अशा प्रकारच्या सुविधा मिळत असतील, तर त्या खर्चाचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच दुरुस्तीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या गैरसोयींमुळे कलाकारांनी भविष्यात या नाट्यगृहात प्रयोग न करण्याचा इशाराही दिला आहे. आता या सर्व आरोपांवर आणि नाट्यगृहातील परिस्थितीवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT