BJP and NCP supporters clash during a bhoomipujan ceremony near Swami Samarth Temple in Kopargaon, creating brief tension in the area. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

BJP And NCP Workers Clash In Kopargaon During Bhoomipujan: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोपरगावमध्ये भूमिपूजन कार्यक्रमावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. श्रेयवादातून सुरू झालेला वाद धक्काबुक्कीत परिवर्तित झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Omkar Sonawane

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कोपरगाव शहरात राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. स्वामी समर्थ मंदिर परिसरातील एका विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन्ही सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना घडली. या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमके काय घडले?

स्वामी समर्थ मंदिर परिसरात आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कामाच्या श्रेयवादावरून आजी माजी आमदारांचे गट आमने-सामने आले. भाजपचे विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांच्या समर्थकांमध्ये हा वाद जुंपला. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी एकाच वेळी भूमिपूजनाचे नियोजन केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. भाजप नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांमध्ये ही चकमक घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थिति नियंत्रणात आणली. साध्या परिसरात शांतता असली तर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोपरगावात गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हे आणि काळे गटात विकासकामांच्या श्रेयवादावरून कलगीतुरा रंगत आहे. आजच्या घटनेमुळे हा संघर्ष आता थेट रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात ही राजकीय लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! कार ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT