Akola Zp School Saam tv
महाराष्ट्र

Zilha Parishad School : वर्ग खोल्या नसल्याने खुल्या मैदानात झाडाखाली भरतेय शाळा; अकोला जिल्हा परिषद शाळांची अवस्था

Akola News : अकोला जिल्ह्यातील दिग्रस बु. या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र या शाळेत वर्ग खोल्याच नसल्याचे खराब चित्र पाहण्यास मिळत आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा भोंगळ आणि एक अजबजगब प्रकार समोर आला. अकोल्यातल्या दिग्रस बु. गावतल्या जिल्हा परिषद शाळा खुल्या मैदानात झाडाखाली भरत आहे. शाळेच्या वर्गखोल्या नसल्याने हि अवस्था निर्माण झाली आहे. मात्र झाडाखाली भारत असलेल्या या वर्गात देखील विद्यार्थ्यांना एका अजब समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पालक संतप्त झाले आहेत. 

अकोला (Akola) जिल्ह्यातील दिग्रस बु. या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र या शाळेत वर्ग खोल्याच नसल्याचे खराब चित्र पाहण्यास मिळत आहे. यामुळे झाडाखाली वर्ग भरविले जात असल्याने समोर आले आहे. पण इथं विद्यार्थ्यांसोबत वेगळं काही घडतं आहे. झाडाखाली भरत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बेंचवर झाडावरील विषारी अळ्या पड़त आहे. याचा या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अपेक्षित वर्ग खोल्या नसल्याने येथील शिक्षक काही वर्ग खुल्या मैदानात भरवत आहे. झाडाखाली सुरू असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे बेंचवर झाडावरील विषारी अळ्या पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचे पालकांचे म्हणणं आहे.  

तर शाळेला कुलूप लावण्याचा इशारा 

शाळेच्या परिसरात असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणांत विषारी अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधण्यात याव्यात; अन्यथा रास्ता रोको आंदोलन व शाळेला कुलुप ठोकू, असा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

SCROLL FOR NEXT