Akola: जिल्हा परिषदेच्या 6 गटात वंचितची बाजी; प्रहारने उघडले खाते Saam TV
महाराष्ट्र

Akola: जिल्हा परिषदेच्या 6 गटात वंचितची बाजी; प्रहारने उघडले खाते

जिल्हा परिषदच्या (ZP Election) 14 गटाचा निकला लागला आहे. तर पंचायत समितीच्या 28 गणांचा काही जागांवरील निकाल अद्याप लागलेला नाही.

जयेश गावंडे

अकोला: जिल्हा परिषदच्या (ZP Election) 14 गटाचा निकला लागला आहे. तर पंचायत समितीच्या 28 गणांचा काही जागांवरील निकाल अद्याप लागलेला नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेवरील सत्ता वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आज लागलेल्या निकालावरून आपल्याच हाती ठेवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निकालात प्रहारने आपले खाते उघडले आहे. जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये वंचितने 6, अपक्ष (वंचित बंडखोर) 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, भाजप एक, शिवसेना एक आणि प्रहारचा एक उमेदवार विजयी झाला आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि पंचायत समितीच्या 28 गणांसाठी पोटनिवडणुकीत 188 उमेदवार रिंगणात होते. तर 3 लाख 71 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला आहे. दरम्यान, या निवडणुकीत वंचितला जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यासाठी दहा उमेदवारांची गरज आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल सुरुवात झाली. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले आहे. तर वंचित मधून बंडखोरी करणारे दोन उमेदवार ही विजयी झाले आहे. या दोघांना मिळून वंचितची विजयी उमेदवारांची संख्या ही आठ वर गेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचे एक, शिवसेनेचे एक, प्रहार जनशक्ती पक्षाचे एक आणि भाजपचे एक उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषदेवर आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे.

तर दुसरीकडे कुटासा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार, त्यासोबतच काँग्रेसचे उमेदवार यांच्यात चांगली टक्कर होईल, असे बोलल्या जात होते. तसेच या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठिचे केली होती. मात्र या मतदार संघात प्रहारने आपले खाते उघडून आमदार मिटकरी यांना धक्का दिला आहे.

विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या निकालावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेवर आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे, असेच म्हणावे लागणार आहे. तर अद्याप पंचायत समितीचे निकाल पूर्ण लागलेले नसल्याने जिल्ह्यातील सात पंचायत समिती पैकी अकोला, तेल्हारा आणि बाळापूर येथे वंचित ने सत्ता राखल्याचा दावा केलाय. तर पातूर पंचायत समितीत शिवसेना आणि वंचितला समान जागा मिळाल्या आहेत. तर दोन पंचायत समितीचा निकाल येणे बाकी आहे. सत्ता बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वंचित बहुजन आघाडी - 6

अपक्ष - 2

राष्ट्रवादी - 2

काँग्रेस - 1

शिवसेना - 1

भाजप - 1

प्रहरव - 1

एकूण 14 जागा

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra News Live Updates: रुपाली चाकणकर यांनी बटेंगे तो कटेंगे वादावरून भाजपला घराचा आहेर

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT