Hiwarkhed Saam Tv
महाराष्ट्र

अकोला: गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र! केली 'ही' मागणी

विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी यासाठी मागील 22 वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे.

अॅड. जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला: अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही मागण्या मान्य न झाल्यास अनेकदा नागरिक हिंसक आंदोलन करतात व त्यामध्ये मोठी जीवितहानी होते, मालमत्तेची अपार हानी होते, शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. रक्तरंजित संघर्ष होतो अनेकांचे रक्त वाया जाते तर अनेक वेळा आपल्या प्रेयसीच्या विरहात प्रियकरांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिण्याचे प्रकार सुद्धा ऐकण्यात येतात. परंतु, अकोल्यातील (Akola) हिवरखेड वासीयांनी गांधीगिरीने रक्तसंकल्प अभियान करून शासनाचे लक्ष वेधले आहे. गावकऱ्यांनी थेट आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहलं आहे.

विदर्भातील (Vidarbha) सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी यासाठी मागील 22 वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन जाणीवपूर्वक नगरपंचायतची उद्घोषणा करण्यास विलंब करीत आहे. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी, आत्मदहन इशारा, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, बाजारपेठ बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने झाली. परंतु शासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी हिवरखेड वासीयांनी रक्त संकल्प अभियान केले. हिवरखेड नगरपंचायत साठी आणि हिवरखेड- तेल्हारा- आडसुळ यासह प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी हिवरखेडच्या जागरूक नागरिकांतर्फे आणि विविध सामाजिक संघटनांमार्फत हिवरखेड येथे रक्त संकल्प अभियान व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

Letter

त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हिवरखेड येथील तब्बल 42 जागरुक नागरिकांनी रक्तदान केले ज्याच्या माध्यमातून शेकडो जणांचे अनमोल प्राण वाचविण्याचे पुण्यकर्म होईल. ठाणेदार विजय चव्हाण यांचे हस्ते श्री महाराणा प्रताप यांचे पूजन करून अभियान सुरू करण्यात आले. सदर अभियानाला अनेक गणमान्य व्यक्तींनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला.

याप्रसंगी डॉ बीपी ठाकरे ब्लड बँक तर्फे डॉ. संतोष सुलताने आणि त्यांच्या चमूने रक्त संकलित केले. सोबतच हिवरखेड वासियांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री ओमप्रकाश कडू, आमदार अमोल मिटकरी, संबंधित विभागांचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी निमा अरोरा व इतर अनेक वरिष्ठांना रक्ताने पत्र लिहिले. रक्तदात्यांनी रक्तदान करून हिवरखेड नगरपंचायत व रस्ता निर्मितीच्या संघर्षात आपला महत्त्वाचा वाटा नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT