Akola News
Akola News जयेश गावंडे
महाराष्ट्र

धक्कादायक! अकोल्यातील दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू

अॅड. जयेश गावंडे

अकोला: सहलीसाठी (trip) गेलेल्या दोन युवकांचा तेलंगणा (Telangana) बासर येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण लटकुटे आणि प्रतिक गावंडे असे या दोघांची नावे आहेत. प्रतिकला वाचविण्यासाठी गेलेल्या किरणचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जुने शहरात (city) राहणारा किरण लटकुटे व भौरद येथे राहणारा त्याचा मित्र प्रतिक गावंडे हे दोघे इतर ७ ते ८ मित्रांसोबत सहलीसाठी गेले होते.

हे देखील पाहा-

तेलंगणामधील बासर येथील तलावामध्ये ते पोहण्यासाठी उतरले होते. त्यामध्ये प्रतिक गावंडे हा बुडत असल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी गेलेला किरण हा अपयशी ठरला आहे. प्रतिक पाठोपाठ किरण ही पाण्यात बुडाला. इतर मित्रांनी (friends) त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत ते दोघेही मित्रांच्या नजरेसमोरून दिसेनासे झाले होते. या दोघांनाही तलावाजवळील नागरिकांनी पाण्यात शोध घेतला.

मात्र, त्या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर पोलिस (Police) दाखल झाले होते. परिसरातील नागरिकांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दोघांच्याही मृत्यूची वार्ता अकोला शहरात व त्यांच्या घराजवळील परिसरात वार्‍यासारखी पसरली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या दोघांच्या मित्रांमध्ये व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. या दोघांनाही आणण्यासाठी त्यांच्या घराजवळील युवक व त्यांचे नातेवाईक बासर येथे गेले असल्याची माहिती आहे. दोघांचेही शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांना अकोल्यात आणण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : ...तर आम्ही मदत केली असती; हिना गावित यांच्या भेटनंतरही शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची नाराजी कायम

धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, राजू शेट्टींचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन, Video

Today's Marathi News Live : शरद पवारांचे कट्टर समर्थक पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर

Fastest Fifty in 2024 : १५ चेंडूंतच ठोकलं अर्धशतक, फ्रेजर मॅक्गर्कनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडला, बुमराहलाही सोडलं नाही!

Potato Wafers Recipe : वर्षभर खराब न होणारे बटाटा वेफर्स रेसिपी

SCROLL FOR NEXT