Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: दहावीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेत संपवले आयुष्य; परिसरात खळबळ

Akola Latest News: मृत मुलगा आईवडील आणि बहिणीसोबत राहत होता. घरात कोणी नसल्याचे पाहून मुलाने गळफास घेवून स्वतःचे आयुष्य संपवले.

Gangappa Pujari

हर्षदा सोनोणे, प्रतिनिधी...

Akola News: दहावीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला (Akola) शहरात घडली आहे. अकोल्यातील खडकी (Khadaki) येथे ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Akola Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोला शहरातल्या खडकी येथे १० वीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आकाश सुदेश निकोजे असे या मुलाचे नाव असून तो आईवडील आणि बहिणीसोबत राहत होता. घरात कोणी नसल्याचे पाहून मुलाने गळफास घेवून स्वतःचे आयुष्य संपवले.

या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असावे.. याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान खदान पोलिसांसमोर आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

३० वर्षीय तरुणाची हत्या..

बीड (Beed Crime) शहरात एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT