Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातून थेट जपानला जायचा रस्ता; नेमका काय आहे प्रकार

नंदुरबार जिल्ह्यातून थेट जपानला जायाचा रस्ता; नेमका काय आहे प्रकार
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे
नंदुरबार
: दिशादर्शक फलकावर गावाच्या नावावर अनेकवेळा खाडाखोड केल्याने अनेक वाद होत असतात. मात्र (Nandurbar) नंदूरबार जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यावरील दिशादर्शक फलकावर एका देशाचा उल्लेख वाचतांना अनेकांचा भुवया उंचावत आहे. या गावातून थेट (Japan) जपानला जाण्याचा रस्ता आहे. (Latest Marathi News)

Nandurbar News
Beed Crime News: धक्कादायक! 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; बीड शहरात खळबळ

साता समुद्रापार असलेल्या जपानला जाण्यासाठी अनेकांचे स्वप्न असते. जपानची प्रगती विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली भरारी अनेकांना या देशाकडे आकर्षित करतात. परंतु जर सातपुड्याच्या दुर्गम भागातुन जपानला जाण्यासाठी रस्ता असल्याचे तुम्हांला सांगितलं तर ते खरं पटणार नाही. परंतु ही किमया केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागांने नंदुरबार जिल्ह्यातील डांब येथे लावण्यात आलेल्या गावांच्या दिशादर्शक फलकावर थेट जपान असा उल्लेख केला आहे.

Nandurbar News
Cases Filed Against Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार? शिर्डी, ठाणे, अमरावतीत गुन्हे दाखल

असा केलाय घोड  
नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेला डाब, तोडीकुंड, चिवलउतारा, खुंटगव्हाण,ओरपाफाटा आणि जमाना गावाकडे जाण्यासाठी डाब येथूनच रस्ता जातो. त्यामुळे या ठिकाणी तो दिशादर्शक (PWD) फलक लावण्यात आला आहे. त्यावर शेवटचे गाव जपान असे लिहिल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र या दिशादर्शक फलकावर जमाना या नावाला 'मा' चा जागेवर 'पा' आणि 'ना' च्या  जागेवरच 'न' अस करत नावात छेडछाड करून त्याला जापान अस करण्यात आलं आहे. जपान देशाचा उल्लेख या आदिवासी पाड्यावर आल्याने नंदूरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com