अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोला : गेल्या महिन्यात मुंबई पोलिस दलाची मान शरमेने खाली घालणारी घटना घडली होती. एका महिला तरुणीची छेडछाड केल्याचा आरोप थेट मुंबई पोलिसातील सहाय्यक उपनिरीक्षकावर झाला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातून असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अकोला पोलिसांची अब्रू वेशीवर टांगणारी घटना समोर आलीये. चक्क एका पोलिस अधिकाऱ्याने तरुणीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शंकर सुरेश बोंडे असं तरुणीची छेड काढणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे (PSI) नाव आहे. पीएसआय बोंडे अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. आज बाळापुर पोलिसांनी तरुणीची छेड केल्याप्रकरणी अटक केलीए, तसेच त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेने अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडालीये.
नेमकं काय होतंये प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या 27 वर्षीय तरुणीचा विनंयभंग केल्याचा प्रकार उजेडात आलाय. सद्यस्थित अकोला शहरात ही तरुणी भाड्याने राहतेय. नेहमीप्रमाणे येथे दररोज या ठिकाणी अकोल्याहून बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्गाने अपडाऊन करतेये. आजही सायंकाळच्या सुमारास तिच्या कार्यलयातील काम आटोपून बाळापूरहून अकोल्याकडे निघाली. त्यावेळी वाटेतचं एक पोलीस अधिकारी तिच्या मागावर लागला.
काही किमी अंतरावर तिचा पाठलाग करून थोडं दूर गाडी आडवी लावली. त्यानंतर तरुणीला म्हणाला की तुझ्याशी २ मिनिटे बोलायचे आहे. त्यानंतर घाणेरडे आणि अश्लील इशारे हाताने करू लागला. त्यानंतर तरुणीने अकोला पोलिसांच्या डायल 112 वर कॉल केला. त्यानंतरत जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले.
तरुणीला पोलीस मदत मिळाली. त्यानंतर बाळापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पुढे तरुणीच्या तक्रारीनंतर कलम 78,79,126(2) BNS नुसार गुन्हा दाखल करून छेड करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शंकर सुरेश बोंडे असं या पीएसआयचं नाव आहे. तो मूळ पिंपळगाव राजा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
अकोला खामगाव राष्ट्रीय महार्गावरील शळद फाटा ते व्याळा रस्त्यावरील जिओ पेट्रोल पंपा समोर असलेल्या फुलावर ही घटना घडली आहे.. या प्रकरणी बाळापुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माधुरी पाटील तपास करीत आहे.
दरम्यान, कायदा रक्षकच जर कायदा मोडत असतील तर सामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा?. असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. या घटनेमुळे अकोला पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याची टीका होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिलेये. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आलंये. मात्र, ही घटना अकोला पोलिसांसाठी मोठा धक्का मानणारी आणि शरमेने मान खाली घालवणारी आहे एकंदरीत या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.