अकोल्यात वाळू माफियांची दादागिरी सुरू
वाळू माफियांना पाहून पोलिसांनी काढला पळ
ट्रॅक्टर चालकाची पोलिसांसोबत हुज्जतबाजी
अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोला : काही महिन्यांपूर्वीच गुजरातमधील पाटणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला होता. गुंडांना पाहून पोलिसांनीच पळ काढल्याची घटना घडली होती. असाच काहीसा प्रकार आता अकोला जिल्ह्याय घडलाय. अकोल्यातील रेतिमाफिया यांच्या दहशतीचा आणि दादागिरीचा एक धक्कादायक आणि संताप देणारा व्हिडिओ समोर आला आहे. अकोला जिल्ह्यात रेती माफियाला पाहून पोलिसांनी वाहनात बसून पळ काढल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या वाळू माफियाने पोलिसांच्या अंगावर आणि वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला.
अकोला जिल्ह्यातील म्हैसांगमधील हा संपूर्ण प्रकार आहे. शुभम मानकर नामक हा नदीतून रेती उपसा करून घेऊन जात असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय. इतकंच नव्हे तर पोलिसाला अक्षरशः शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अकोला जिल्ह्यातील मैसांग गावातील हा प्रकार आहे. साधारणतः हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा असल्याचं समजते आहे. सद्यस्थितीत हा व्हिडिओ आता 'साम'च्या हाती लागलाय. रेतीचा ट्रॅक्टरचा अकोल्यातील बोरगाव मंजू पोलिसांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ट्रॅक्टर चालकाने पोलिसांसोबत हुज्जतबाजी करत दादागिरी केली.
इतकेच नव्हे तर या पोलीस कर्मचाऱ्याला ट्रॅक्टर चालकाने अक्षरशः खालच्या स्तरावर जात शिवीगाळ केली. एकच नव्हे तर तलवारीच्या धाक दाखवत पोलिसांना पळून जाण्यास भाग पाडले. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की ट्रॅक्टर चालक हा पुढे जाऊन पुन्हा ट्रॅक्टर रिव्हर्स आणत पोलिसांच्या वाहनावर नेत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. शुभम मानकर असं या ट्रॅक्टर चालकाचे नाव असल्याची माहिती समोर आली.
शुभमने अश्लील शिवीगाळ करत पोलीस वाहनावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसाला अश्लील शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली, हे सर्व पाहणाऱ्या पोलिसांनी आपल्या मोबाईलमध्ये प्रसंग चित्रित केलाय. मात्र, घटनेला दोन दिवस उलटूनही अद्यापही या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.
शुभम मानकर हा नदीतून रेतीचा उपसा करून वाहतूक करण्याचे काम करतोय. अनेकदा त्याचे तहसीलदार आणि पोलिसांची वाद होतात, अनेक तक्रारी त्याच्याविरोधात आहेत. मात्र कोणतीही कठोर कारवाई त्याच्यावर अद्यापपर्यंत झाली नाहीये. त्यामुळं अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.