अकोला जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना
प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय
रेल्वे ट्रॅकवर आढळले दोघांचे मृतदेह
अक्षय गवळी, साम टीव्ही
महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातून धक्कादायक आणि तितक्याच भयंकर एका लव्हस्टोरीचा दुर्देवी शेवट झालाय. एका प्रेमी युगलाने मुंबई-नागपूर रेल्वे ट्रॅकवर मालगाडी समोर उडी घेत आत्महत्या केलीये. कुटुंबीयांचा लग्नाला मोठा विरोध झाला. त्यामुळे या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचं समोर आलंये. 32 वर्षीय अक्षय सुरेश थारकर तर 24 वर्षीय अक्षदा मोहन शेजोळे असं आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचं नाव आहेय. काल अकोल्यातल्या कसुरा गावाजवळील रेल्वे ट्रॅकवर दोघांचे मृतदेह आढळून आले. आज मृतदेहावर शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली, उरळ पोलिसांकडून या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पण या घटनेने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
'साथ जियेंगे साथ मरेंगे, हम तुम दोनों लैला, मरने से नईयो डरना, तन भी तेरा मन भी तेरा.. जान भी तेरी हैं छैला!, मरने से नईयो डरना लैला, प्यार हमारा अमर रहेगा!..याच ओळीप्रमाणे अकोल्यातल्या एका बस ड्रायव्हर तरुणाच्या आणि शाळेवरील तरुणी शिक्षिकेच्या प्रेमाचा भयंकर शेवट झाला. ही गोष्ट आहेये अकोला जिल्ह्यातीलच बाळापुर तालुक्यातल्या शेळद गावातील 'अक्षय अन अक्षदा' या दोघांची. अक्षय हा अकोला पुणे चालणाऱ्या ट्रॅव्हल्सवर वाहन चालक होता. तर 'अक्षदा' ही तालुक्यातीलचं अंत्री मलकापूर गावातल्या एका खाजगी शालेयवर शिक्षिका म्हणून कार्यरत होती. या दोघांचं एकमेकांवर अगदी जीवापाडचं प्रेम. एकमेकांच्या घरापासून काही अंतरावरचं दोघांचंही घर... दोघांमध्ये सुरुवातीला चांगली मैत्री झाली, बघताबघता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालंये. वर्षभराहून जास्त काळ दोघांचं प्रेम चाललंये. सर्व काही सुरळीत सुरू होतंये.
काही दिवस उलटले, इकडे अक्षय'च्या लग्नाचं वय झालं, अन तिकडं अक्षदा ही पण लग्नाली आली. दोघांनाचं प्रेम जीवापाडचं.. आयुष्यभर सोबत राहण्याचा दोघांचा निर्णय घेतला होता. कालांतरानं त्यांनी प्रेम प्रकरण कुटुंबीयांच्या कानावर टाकलंये. पण इथूनचं त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांकडून विरोध सुरु झाला. काही दिवस दोघांमध्ये बोलण-भेटणं बंद झालं. अक्षय बस ड्रायव्हर असल्याचं कारण पुढं ठेवत 'अक्षदा'च्या कुटुंबीयांकडून लग्नाला मोठा विरोध झाला. काही दिवसाताच दिवसातच तिला लग्नासाठी पाहुणे पाहायला येऊ लागले.
आत्महत्येच्या आदल्या दिवशी काय घडलं?
31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. याच रात्री 2026 या नव्या वर्षाचं स्वागत सर्वीकडं सुरु असतानाचं कसूरा गावातून दुःखद बातमी समोर आली. एका प्रेमी युगलाने मालगाडी समोर उडी घेत आत्महत्या केल्याची वार्ता सर्वत्र पसरली. 'उरळ पोलीस'ही घटनास्थळी दाखल पोचले अन पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदेसह त्यांच्या टीमकडून घटनेचा पंचनामा झाला. पुढं थोड्यावेळातच दोघांची ओळख पटली.
अक्षय थारकर आणि अक्षदा शेजोळे असं मृतांची नावे असल्याचं समजलं. दोघांत प्रेम होतं, मात्र कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता, त्याच नैराशातून दोघांनीही टोकाची पाऊले उचलली, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. दरम्यान, काही गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधारणतः 30 डिसेंबरच्या जवळपास मृत तरुणी 'अक्षदा' हिला लग्नाचं स्थळ आलं आणि पाहुणे बघून गेले. त्यानंतर दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असंही गावकऱ्यांकडून सांगण्यात आलं. आज या घटनेनं शेळद गावासह अकोला जिल्ह्यात शोकाकूल वातावरण पसरलंये.
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सर्वांचं सारखंचं असतं. या ओळी प्रत्येक प्रेम प्रकरणात लागू होतीलच, असं नाहीये. प्रत्येकाचं प्रेम सारखं नसतं. कारण, प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्टही वेगळीच राहतं. काहींना आपलं प्रेम आयुष्यात मिळतं, तर काहींनी नाहीये. अनेकदा प्रेमीयुगुलांना कुटुंबीयांकडून विरोधही होतो. त्यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल प्रेमयुगुलांकडून उचललं जातं. मग या प्रेमाला पूर्णविराम लागतो. मात्र, पूर्णविराम लागूनही खरे प्रेमीयुगुल आशा सोडत नाहीत. ते कुटुंबियांचा विरोध झुगारुन आपली नौका पैलतिरी नेतातच. परंतु अकोल्यातल्या 'अक्षय आणि अक्षदा' या दोघांनी घेतलेला निर्णय, अगदी चुकीचा असल्याच मत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.