Akola Shocking crime news Saam Tv News
महाराष्ट्र

काळविटाची शिकार अन् मांसाची वाटणी, जेवणाच्या ताटावरूनच अटक; परिसरात खळबळ | Akola

Blackbuck hunting case: अकोल्यात काळविटाची शिकार करून मांस खाणाऱ्या तिघांना वनविभागाने जेवणाच्या ताटावरून रंगेहात पकडलं. मुख्य आरोपी फरार असून वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

काळविटाची शिकार करून त्याचे मांस खाण्याऱ्या आरोपींना अकोला प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने जेवणाच्या ताटावरूनच रंगेहाथ अटक केली आहे. ही घटना अकोट वनपरिक्षेत्रातील जऊळखेड येथे रविवारी घडली. या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तिघांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जऊळखेड गावात काळविटाचे मांस विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत कारवाई करत वनविभागाने अंकुश गणेश इंदौरे, गणेश दयाराम इंदौरे (वडील-मुलगा) आणि दिगंबर जनकीराम घारे या आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली. यावेळी दिगंबर घारे काळविटाचे मांस शिजवून खात असताना रंगेहाथ पकडलं.

मुख्य आरोपी ईश्वर बाळकृष्ण इंदौरे हा सध्या फरार असून, त्यानेच अंकुश इंदौरेसोबत मिळून कुटासा परिसरात काळविटाची शिकार केली होती. शिकार केल्यानंतर त्यांनी मांसाची हिस्सेवाटणी केली होती. ही धडक कारवाई उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. आर. थोरात यांच्या नेतृत्वात वनकर्मचारी पी. ए. तुरुक, अतिक हुसेन, सुभाष काटे, सोपान रेळे, तुषार आवारे यांच्या पथकाने केली.

वन्यप्राणी संरक्षणासाठी समाजाच्या पुढाकाराची गरज

वन्य प्राणी ही निसर्गाची मौल्यवान देणगी आहे. त्यांचे संवर्धन आणि संरक्षण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्यावरील कोणत्याही प्रकारची हिंसा, शिकार किंवा त्रासदायक कृती आढळल्यास नागरिकांनी त्वरित शासनाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर माहिती द्यावी. आपली ओळख गोपनीय ठेवली जाईलं, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. आर. थोरात यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT