BJP Removes 3 Office-Bearers Over Rebel Stand Saam
महाराष्ट्र

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

BJP Removes 3 Office-Bearers Over Rebel Stand: अकोल्यातील अकोट शहरात मोठी राजकीय घडामोड. तीन भाजप नेत्यांची पक्षातून हकालपट्टी. पक्षात नाराजीचा माहोल.

Bhagyashree Kamble

  • भाजपनं तीन पदाधिकाऱ्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी हाकललं

  • आतापर्यंत एकूण १० नगरसेवकांची तिकीट कापले

  • भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष वाढला

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच अकोट शहरातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. भाजप पक्षाने ३ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केलीआहे. तिघांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अकोट शहरात भाजपने एकूण १० नगरसेवकांची तिकीट कापले आहेत. यामुळे पक्षात अंतर्गत नाराजीचे सूर उमटत असून, याचा फटका भाजपला आगामी काळात बसणार असल्याचं बोललं जात आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात भाजपने तीन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. भाजपा युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी सागर बोरोडे, अकोटचे भाजप शहर उपाध्यक्ष सागर उर्कडे आणि अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वाकीलोद्दिन रियाजोद्दीन या तिघांची पक्षातून पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलीये.

सागर बोराडे यांनी बंडखोरी केली असून, त्यांनी पत्नी महिमा बोरोडे यांना नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलीये. तर सागर उर्कडे यांनीही पत्नी कपाली उर्कंडे यांना नगरसेवक पदासाठी निवडणुकीत उभे केले. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षकांनी त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. एकंदरीत यंदा अकोट शहरात भाजपने १० नगरसेवकांची तिकीट कापल्याने भाजप पक्षात अंतर्गत नाराजीचा सुरु उमटत आहे, त्याचा फटकाही भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे.

नेमकं काय आहे पत्रात?

अकोट नगर परिषद निवडणुक नोव्हेंबर २०१५ मध्ये होत आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारांचे विरुद्ध शिवसेना उबाठा, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवीत असलेले भाजपाचे पदाधिकारी सागर बोरोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी, यांच्या पत्नी महिमा सागर बोरोडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवीत आहेत.

अकोट शहर उपाध्यक्ष सागर त्र्यंबकराव उर्कडे यांच्या पत्नी कपाली सागर उर्कंडे अपक्ष तर वाकीलोद्दिन रियाजोद्दीन अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष यांची भारतीय जनता पक्षामधून ६ वर्षांकरिता हकालपट्टी करण्यात आली. पुढील ६ वर्षांमध्ये यापैकी कुणालाही बैठकीचा निरोप दिल्या जाणार नाही, निवडणूक संबधित हकालपट्टी केलेल्या व्यक्तींचा काहीही संबंध पक्षासोबत राहणार नाही, असेही भाजपच्या आदेश पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro New Line: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला होणार सर्वाधिक फायदा?

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती ,जिल्हाधिकारी यांची माहिती

Malaika Arora: मलायका अरोरा ज्याच्या प्रेमात पडली; तो हर्ष मेहता आहे कोण?

Accident: महामार्गावर अपघताचा थरार! भरधाव टेम्पो अन् कारची समोरासमोर धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यातील बुधवार पेठेत भयंकर घडलं; चिठ्ठी लिहून तरूणीनं ९व्या मजल्यावरून उडी घेतली, आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT