महाराष्ट्र

Maharashtra Politics: अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, १६ नगरसेवकांचे तडकाफडकी निलंबन; कारण आलं समोर

Mayor Suspends 16 Corporators In Akola: अकोल्यामध्ये महापौरांनी १६ नगरसेवकांचे तडकाफडकी निलंबन केले. अकोला महानगर पालिकेतील सभेमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Priya More

Summary -

  • अकोल्यात मोठी राजकीय घडामोड

  • १६ नगरसेवकांचे तडकाफडकी निलंबन

  • बजेट सभेदरम्यान गोंधळ आणि घोषणाबाजी

  • विरोधकांचा ठिय्या आंदोलन

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यात मोठी राजकीय घडामोड घडली. महापौरांनी १६ नगरसेवकांचे तडकाफडकी निलंबन केले. निलंबन करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा समावेश आहे. महापौरांनी केलल्या या कारवाईमध्ये अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापौरांनी केलेल्या कारवाईनंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला होता. जवळपास ३० मिनिटं विरोधकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केलं.

अकोला महापालिकेची आज विशेष सर्वसाधारण सभा होत असून यामध्ये अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात येत आहे. अकोला महापालिकेचे सन २०२५-६ चे सुधारित आणि सन २०२६-२७ च्या स्थायी समितीने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करून या विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. आज महापालिकेने या आर्थिक वर्षासाठीचे तब्बल १५०५.०७ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली २० मार्च रोजी स्थायी समितीकडे सादर केले होते. यात काय दुरुस्ती होतात हे पाहणे महत्त्वाचे असणारे होत. परंतू आज मनपाच्या सभागृहात महापौर शारदा खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु असतानाच गोंधळ उडाला.

काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात जवळपास ३० मिनिट ठिय्या दिला. महापालिकेचे २०२६-२७ च्या बजेटबद्दल बोलू न दिल्याने वंचित, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नगरसेवक विजय इंगळे आणि अभय कुमकर हे देखील आक्रमक झाले. या दरम्यान वंचितच्या नगरसेवकांनी सभेमध्ये '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर काँग्रेस, उबाठा आणि वंचितच्या नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या द्यायला सुरुवात झाली. वंचित नगरसेवक पराग गवई आणि निलेश देव यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आकाश कवडे, झिशान हुसेनसह इतर १६ नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या दिला होता. यावेळी सभागृहात नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी माफी मागावी, असं हट्ट विरोधकांनी लावला.

यानंतर महापौरांनी सभागृहात गैरवर्तन आणि गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत १६ नगरसेवकांना पुढील ३ बैठकासाठी निलंबन केले. तरीही निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांचा ठिय्या सुरू होता, अखेर सभागृहात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. महापौरांच्या आदेशानंतर १६ नगरसेवकांना सभागृहाच्या बाहेर काढण्याय आले. दरम्यान, अकोल्यातील माध्यमांना महानगरपालिकाच्या प्रत्येक सभेला प्रवेश नाकारण्यात येतो. आज देखील विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महापालिकेत प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे सर्व पत्रकार आक्रमक झाले आणि प्रवेश द्वारावर पत्रकारांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. पत्रकारांना अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोपर्यंत आयुक्त, महापौर आणि सभापती येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा या ठिकाणी पत्रकारांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरपंचानं जिवंतपणीच केलं स्वतःचं पिंडदान, अंधश्रद्धेला घातली मुठमाती

'गेट आऊट! 'नारी शक्ती'च्या मोर्च्यात नारीच भडकली, भाजपच्या आंदोलनात महिला का चिडली?

धायरीचा पोस्टर बॉय! लग्न जुळवण्यासाठी जागोजागी पोलिसांचे बॅनर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्यात भाजपची मोठी रणनीती; युवकांना जोडण्यासाठी आखला मास्टरप्लान

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

SCROLL FOR NEXT