Akola News Saam TV News Marathi
महाराष्ट्र

पुण्याचा पॅटर्न अकोल्यात, पोलिसांनी गावगुंडाची काढली धिंड, दिला कडक इशारा

Akola Police मूर्तीजापूरमध्ये महिलांनी तक्रार केल्यानंतर, सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी गावगुंडांची धिंड काढली. सनी विजय दुबे, वैभव संतोष कोकाटे, यश अनिल चन्ना केसले, आकाश वासुदेवराव उईके आणि योगेश उर्फ आदित्य कोकाटे.

Namdeo Kumbhar

  • अकोला पोलिसांनी गावगुंडांची धिंड काढून नागरिकांना माफी मागायला लावली.

  • महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

  • भयानक गणेश मंडळाला परवानगी नाकारली गेली.

  • पोलिसांचा कडक इशारा – कायद्यात राहा, नाहीतर कारवाई होईल.

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

राज्यात गुन्हेगारांवर वचक निर्माणकरण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढल्या जातंय. अकोल्यातल्या मूर्तिजापुरात देखील गाव गुंडांची धिंड काढण्यात आली आहे. या अट्टल गुन्हेगारांनी अक्षरशः कान पकडून नागरिकांना माफी मागितली आहेये. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या 5 गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी मूर्तिजापूर पोलिसांनी हा 'रोड शो' काढला होता. दरम्यान, सनि विजय दुबे, वैभव संतोष कोकाटे, यश अनिल चन्ना केसले, आकाश वासुदेवराव उईके आणि योगेश उर्फ आदित्य कोकाटे असे या गाव गुंडाची नावे आहे. या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. यापुढे 'जे कायद्यात राहतील तेच फायद्यात राहतील', असा इशारा अकोला पोलिसांनी दिलाय.

नेमकं काय घडलं होतंय?

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातलं 'भयानक गणेश मंडळ'. या मंडळाला यंदा परवानगी देऊ नये, अशा विनंती स्थानिक 16 महिलांनी मूर्तिजापूर पोलिसांकडं केली. कारण, या भयानक गणेश मंडळात दरवर्षी मंडळाच्या नावाखाली जुगार खेळणे, रात्री उशिरापर्यत जोरात गाणे वाजवणे, स्थानिकांना त्रास देणे, या ठिकाणी चालत होते. यामुळं यंदा मंडळ स्थापनेची परवानगी देऊ नये, अशा तक्रारीवरून पोलीस मंडळाच्या ठिकाणी दाखल झाले. आणि त्यांना कडक शब्दात सूचना दिली. मात्र, पोलीस परतल्यानंतर मंडळाचे सदस्य सनि दुबे आणि कोकाटे यांनी तक्रारकर्ता महिलांच्या घरात घुसून शिवीगाळ आणि विनयभंग केलाय. या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करून पाचही जणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पाचही जणांना अटक केलं होतं. विशेष म्हणजे, पोलिसांनी या भयानक गणेश मंडळाची देखील परवानगी नाकारली आहे.

गणेश मंडळाच्या 2 सदस्यांवर तडीपाराची कारवाई..

पोलिसांच्या माहितीनुसार, भयानक गणेश मंडळाचा अध्यक्ष असलेला सनी दुबे आणि योगेश कोकाटे या दोघांनाही मूर्तिजापूरातून शहरातून आधीच तडीपार करण्यात आलं होतं. असे असताना दोघेही शहरात वावरताना दिसून आले, तसेच मंडळाची तयारी करताना दोघे उपस्थित होते. या संदर्भात देखील पोलिसांनी नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार, उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊ नका; ज्योतिषाचं भाकीत

Maharashtra Live News Update: पुण्यातील ससून रुग्णालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन

HDFC Bank : HDFCच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; २३ ऑगस्टला काही सेवा राहणार बंद

गणेश चतुर्थीला करा 'हे' उपाय; कर्जापासून मिळेल मुक्ती

Cyber Crime : व्हाट्सअपवर लग्न आमंत्रणाची एपीके फाईल; ओपन करताच खात्यातील रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT