Police notice to WhatsApp Group Admin
Police notice to WhatsApp Group Admin Saam tv
महाराष्ट्र

Police notice to WhatsApp Group Admin: व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनना पोलिसांकडून नोटीस, काय आहे कारण? जाणून घ्या

साम टिव्ही ब्युरो

Akola Crime News : जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टने दोन धर्मात वाद उफाळून आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले असून, अकोला शहरातील सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमीनला पोलीस निरीक्षकांनी नोटीस बजावल्या आहेत.

अकोला शहरामध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने मेसजे केल्यामुळे रामदासपेठ तसेच जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत त्याच्या प्रतिक्रिया उमटून विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये जिवित व वित्त हानी झाली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत पोलिसांनी माहिती गोळा केली आहे. त्यामध्ये ग्रुप ॲडमिनला नोटीस बजावून आक्षेपार्ह मचकूर व्हायलर होणार नाही याची, काळजी घेण्याबाबत बजावण्यात आले आहे.

काय आहे नोटीसमध्ये?

अकोला (akola district) शहराची परिस्थिती पाहता शुल्लक घटनेवरून जातीय तणाव तसेच दंगली झाल्याचा पूर्व इतिहास आहे. ग्रुप ॲडमिन म्हणून ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना योग्य सूचना द्याव्यात. कोणीही कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत तसेच समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही या दृष्टीने ॲडमिन किंवा ग्रुपच्या सदस्यांनी योग्यती दक्षता घ्यावी, अशी सूचना नोटीसमधून देण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

ग्रुप ॲडमिनवर कायदेशिर कारवाई होणार

सर्व सोशल मीडिया ग्रुप ॲडमिनला नोटीस देवून अकोला शहरात शांतता राखण्याचे दृष्टिकोनातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर, व्हिडीओ टाकणाऱ्यावर पोलिस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे.

समाजकंटकांकडून सोशल मीडियाचे माध्यमातून चुकीचे संदेश, अफवा पसरविले जातात. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध तसेच संबंधित ग्रुप ॲडमिन यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून दिला आहे.

याबाबत माहिती देताना अकोला सिव्हिल लाईन्स येथील पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे म्हणाले की, ''अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार अकोला शहरांची परिस्थिती तसेच दंगली झाल्याचा पूर्व इतिहास बघता सोशल माध्यमातून कोणीही कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. या दृष्टीने ग्रुप ॲडमिन किंवा ग्रुपमधिल सदस्यांना आवश्यक ती दक्षता घेणयाबाबत नोटीस बजावली आहे. ग्रुप ॲडमिनला बजावण्यात आलेल्या या नोटीस कायदेशिर पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे. त्यामुळे ग्रुप ॲडमिन यांनी सर्व सदस्यांना त्याबाबत सूचना द्याव्यात.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT