Jalna Crime News: बाप नव्हे हैवान! पोटच्या मुलींना चक्क विष पाजून मारलं; मन सुन्न करणारी घटना

Crime News: बाप नव्हे हैवान! पोटच्या मुलींना चक्क विष पाजून मारलं; मन सुन्न करणारी घटना
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam tv
Published On

Jalna Crime News: जालण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन मुलींना विष पाजून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अंबड तालुक्यातील शहागड येथे ही घटना घडली होती. या घटनेत सहा वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसर हादरलं आहे.

त्यानंतर दीड वर्षाच्या मुलीवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा ही दुर्दैवी मृत्यु झाल्याने पुन्हा एकदा शहगड परिसरात एकच खबळ उडाली आहे.

Jalna Crime News
Sharad Pawar News : राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभा-विधानसभा निवडणुकांबाबत मोठा निर्णय, शरद पवार म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, शहागड येथील कृष्णा पंडित हा अंबड येथे कॉम्प्युटर ऑपरेटरचे व्यवसाय करतात. तर त्यांची पत्नी मनीषा पंडित विश्वकर्मा को-ऑपरेटिव बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सोमवारी सायंकाळी हे पती-पत्नी दोघेही घरी कामावरून परतल्यानंतर दोघांमध्ये वाढ झाला. (Latest Marathi News)

या वादातून कृष्णा पंडित याने आपल्या पत्नीला जबर मारहाण केल्याने या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाला. त्यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. त्यानंतर मंगळवारी सकाळी कृष्णा पंडित याने सकाळी दहाच्या सुमारास आपल्या दीड आणि सहा वर्षाच्या मुलीला घेऊन पैठण फाट्यावरील त्यांच्या नातेवाईकाची वीटभट्टी गाठली. (CRIME NEWS)

वीट भट्टीवर त्याने आपल्या दीड वर्षाच्या आणि सहा वर्षाच्या मुलीला विषारी औषध घेऊन स्वतःहा हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला तात्काळ गेवराई येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सहा वर्षाची मुलगी श्रेया दुर्दैव मृत्यू झाला. तर दीड वर्षाच्या शिवाज्ञा व कृष्ण पंडित यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.

Jalna Crime News
J P Nadda On Thackeray Government: ठाकरे सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला; भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गंभीर आरोप

आता सहा वर्षाच्या श्रेयाचा दुर्दैव मृत्यू झाल्याने शहागडसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काल दुपारी दीड वर्षाच्या शिवाज्ञा या मुलींचा ही दुर्दैवी मृत्यु झाल्याने या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात मनीषा पंडित यांच्या जबाबावरून कृष्णा पंडित याच्याविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com