Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola : ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; गावकऱ्यांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा

Akola News : पावसाळ्यात सर्व नदी नाल्यांना पूर येत असल्यामुळे पाण्याची असलेली समस्या दूर होत असते. मात्र जलजीवन मिशन अंतर्गत काम झाले असताना देखील गावात पाण्याची समस्या जाणवत आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: पावसाळ्यात प्रामुख्याने पाण्याची समस्या फारशी उद्भवत नाही. मात्र अकोल्यात ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आज ग्रामस्थांनी हा घागर मोर्चा अकोला जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला होता. 

अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील भंडारज बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आज हंडा मोर्चा काढला होता. भंडारज बुद्रुक येथे जलजीवन मिशन- २०२२ मध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार कंत्राटदाराने रेट्रोफिटींग ९८ टक्के काम पूर्ण केले आहे. असा पाणी पुरवठा विभागाचा अहवाल असून यासाठी ४८.७३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. गावाला मंजूर रेट्रॉफिटिंगचा मुख्य उद्देश म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेमध्ये सुधारणा करून घरोघरी नळ गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे आहे. 

योजनेत भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप 

मात्र, जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता मिलिंद जाधव त्यांनी नेमलेले खाजगी पर्यवेक्षक तसेच दिल्लीवरून आलेली कंपनी वायकॉम आणि कंत्राटदार श्याम माहोरे यांनी जलजीवन मिशन कामात भ्रष्टाचार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला. त्यामुळे योजना फक्त कागदावर पूर्ण झाली असून गावाला ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नाही. गावात ग्रामस्थांना पाण्यासाठी सद्यस्थितीत भटकंती करावी लागत असल्याने मोर्चा काढण्यात आला. 

शेकडो महिला धडकल्या 

जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्ट्राचारामुळे नागरिक पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप वंचित कडून करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी वंचितने केली. या मोर्चात शेकडो ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनी डोक्यावर घागर घेत पिण्याच्या पाण्याची मागणीसाठी जोरदार घागर मोर्चा काढला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT