Akola Hatrun Zilha Parishad By election Result latest News SAAM TV
महाराष्ट्र

Akola : हातरुण जिल्हा परिषद गट पोटनिवडणुकीत 'वंचित' विजयी; शिवसेनेला मोठा धक्का

अकोला येथील हातरुण जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण गटात 'वंचित बहुजन आघाडी'ने शिवसेनेला धक्का दिला आहे. हातरूण गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत वंचितनं विजय मिळवला आहे. हातरुण गटाच्या पोटनिवडणुकीसाठी काल, रविवारी मतदान झाले. पोटनिवडणुकीचा आज, सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. (Akola News Update)

वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) लीना शेगोकार या ४३०१ मते मिळवून विजयी झाल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अश्विनी गवई यांना २६६० मते मिळाली आहेत. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस स्वबळावर लढला होता.

जिल्हा परिषदेच्या बाळापूर तालुक्यातील हातरूण गटातून (Hatrun) निवडून आलेल्या शिवसेनेच्या सदस्या सुनीता गोरे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यामुळे या गटासाठी पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व वंचितच्या उमेदवारांमध्येच थेट लढत पाहायला मिळाली. तर एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होता.

या निवडणुकीवर जिल्हा परिषदेमधील सत्तासमीकरण अवलंबून असल्याने ही निवडणूक सत्ताधारी वंचित व विरोधातील इतर पक्षांसाठी अतिशय महत्वाची मानली जात होती. दरम्यान आजच्या निकालानंतर वंचितच्या लीना शेगोकार यांना ४३०१ मते मिळाली. शिवसेनेच्या (Shivsena) अश्विनी गवई यांना २६६० मते, भाजपच्या राधिका पाटेकर यांना २०९१ मते, काँग्रेसच्या रशिका इंगळे यांना ३६२ मते मिळाली. या निवडणुकीत वंचितच्या शेगोकार या १६४१ मताधिक्याने विजयी झाल्या.

...तर वंचित बहुजन आघाडी सत्ता राखणार?

अकोला (Akola) जिल्हा परिषदेचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने जुलै महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडणुका होणार आहेत. ५३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी २७ सदस्यांची गरज भासणार आहे. वंचितची आजच्या विजयानंतर २५ सदस्य संख्या झाली आहे. मात्र तरीही वंचित बहुजन आघाडीला आणखी दोन सदस्यांची गरज लागणार आहे. दरम्यान गेल्या निवडणुकीत भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याने वंचितने सत्ता काबीज केली होती. दरम्यान, जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पोटनिवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

वंचित बहुजन आघाडी (अपक्षासह): २५

शिवसेना : १२

भाजप : ०५

काँग्रेस : ०४

राष्ट्रवादी : ०४

प्रहार : ०१

अपक्ष : ०२

महाविकास आघाडी (२३)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT