Arvind Sawant Saam tv
महाराष्ट्र

Arvind Sawant : राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा उबाठाचा निर्णय पक्का; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर अरविंद सावंत यांचे वक्तव्य

Akola News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, राज ठाकरेंना सोबत न घेण्याचा काँग्रेसचा विचार असेल.‌ परंतु, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा आमचा विचार पक्का

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून आता महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे. या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे अधिकार मुळात हर्षवर्धन सपकाळांना आहेत का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. 

शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत हे अकोला येथे आले असताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, राज ठाकरेंना सोबत न घेण्याचा काँग्रेसचा विचार असेल.‌ परंतु, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा आमचा विचार पक्का झाल्याचं खासदार सावंत म्हटले आहे.‌ यासंदर्भात दसरा मेळाव्यातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे सोबत एकत्र आलोय हे सोबत राहण्यासाठीच असल्याचं स्पष्ट केल्याचे सावंत म्हणाले. 

काँग्रेसला सोडणार का? 

राज ठाकरेंच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सोडणार का? या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. राज ठाकरेंसोबत शिवसेना जाण्याचा निर्णय पक्का झाल्यास ते म्हणालेय. दरम्यान, मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकावरून झालेल्या वादावरून त्यांनी जोरदार टीका केली आहे. प्रबोधनकारांचे पुस्तक फेकणारी आणि सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करणारी प्रवृत्ती एकच असल्याचं ते सावंत बोलले. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचंही ते म्हणाले. यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

आम्हाला निश्चितच न्याय मिळेल 
दरम्यान, उद्या शिवसेनेच्या चिन्हा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या अंतिम सुनावणीवरही त्यांनी भाष्य केले आहे. या विषयावर सुनावणी ही माजी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या कार्यकाळातच होणं अपेक्षित होते.‌ चंद्रचूड यांच्या सर्वोच्च न्यायालयातील कार्यकाळावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. चंद्रचूड यांनी केलेल्या गणेश आरतीचा पूर्ण एकदा त्यांनी उल्लेख केला. तर उद्याच्या सुनावणीत निश्चितच आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास खासदार अरविंद सावंत यांनी बोलून व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

टॉयलेटमध्ये तासनतास फोन घेऊन बसल्याने होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT