Akola Crime
Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : अकोटमध्ये 'सुपर शॉपी' फोडले; अवघ्या १६ मिनिटांत गल्ल्यातील रोकड घेऊन फरार, चोरटे सीसीटीव्हीत कैद

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: अकोल्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातील (Akot) अकोट शहरात सुपर शॉपमध्ये देखील चोरी झाल्याचे समोर आले आहे. 'ए-मार्ट' शॉपचे शटर वाकवून आत घुसून दोन चोरांनी गल्ल्यातील रक्कम चोरी केली आहे. अवघ्या १६ मिनिटांत या चोरटे (Akola) गल्ल्यातील रक्कम घेऊन फरार झाले आहेत. या प्रकरणी अधिक तपास आकोट शहर पोलीस करीत आहे. ही घटना शॉपच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Latest Marathi News)

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील सुपर शॉपी (ए-मार्ट) अकोट दर्यापुर रस्त्यावर आहे. आज सकाळी शॉपचे मालक अनूप सुभाष अंबाळकर हे आले असता त्यांना शॉपमध्ये चोरी (Theft) झाल्याचे लक्षात आले. याची माहिती त्यांनी अकोट शहर पोलिसांना (Akot Police) कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवण्याच काम करीत आहे. दरम्यान शॉपमध्ये आणखी काय चोरीला गेले आहे, हे अद्यापपर्यंत कळू शकले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१६ मिनीटात केली चोरी
शॉपच्या सीसीटीव्हीमध्ये दोन चोरटे चोरी करतांना दिसत आहे, ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी हे दोन चोरटे शॉपजवळ आले अन् शॉपचे शटर वाकवून त्यांनी आत प्रवेश केला. शॉपमधील गल्ल्यातील ५० रुपयांच्या जवळपास दहा हजार रुपयांच्या नोटा लंपास केल्या आहेत. तसेच इतरही रक्कमेवर हात साफ केला आहे. हे सर्व करून चोरटे ४ वाजून २१ मिनिटांनी शॉपच्या बाहेर पडले आणि पसार झाले. अवघ्या 16 मिनिटमध्ये हा संपूर्ण चोरीचा प्रकार झालाय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri News: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले

Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

Maharashtra Lok Sabha Voting Live: निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके

SCROLL FOR NEXT