Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola : विद्यार्थ्यांची रिक्षात कोंबून वाहतूक; तपासणी करताना आमदार मिटकरींसोबत घातला वाद

Akola News : वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष कसे होते? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार असल्याचे मिटकर यांनी म्हटले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : रिक्षांमधून विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून वाहतूक केली जात असते. अशाच प्रकारे अकोल्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या मुद्दा आमदार अमोल मिटकरी यांनी समोर आणला होता. दरम्यान आज प्रत्यक्ष रिक्षा तपासणी करताना आमदार मिटकरी यांच्यासोबत काही जणांनी वाद घालत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. 

ऑटो रिक्षामधून शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरु असल्याचा प्रकार आमदार अमोल मिटकरी यांनी समोर आणला आहे. या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत देखील मांडला होता. यानंतर आज अकोल्यातल्या अकोट फैल भागातून मिटकरी जात असताना त्यांना शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक जीवघेणा प्रवास त्यांच्या नजरेस पडला. यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या चार- पाच रिक्षांची तपासणी देखील केली. 

रिक्षा चालकांना घेतले फैलावर 

अकोल्यात ऑटो रिक्षामधून १३ ते १४ शालेय विद्यार्थ्यांना कोंबून बसवत वाहतूक सुरु होती. जवळपास ३ ते ४ शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांना मिटकरींनी रोखलं होत. या दरम्यान मिटकरींनी रिक्षातील विद्यार्थ्यांची संख्या मोजून दाखवली, ते पाहून त्यांनाही धक्का बसला. या कारणावर आमदार मिटकरी यांनी रिक्षा चालकाला चांगलेच सुनावले.

मिटकरींसोबत घातला वाद 
दरम्यान, या संपूर्ण घडलेल्या प्रकारानंतर अकोट फैल भागात मोठा गोंधळ उडाला होता. रिक्षा चालक आणि स्थानिक तरुणांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या विषयावरून आमदार मिटकरी यांच्यासोबत वाद घातला तसेच त्यांना शिवीगाळ केल्याचे देखील आमदार मिटकरी यांनी सांगितले. मुलांच्या जिवाशी खेळण्याचा मुजोरपणा रिक्षा चालक करत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: जुई गडकरीचा नवा प्रवास, सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

Maval : रिंग रोड, टीपी स्कीमला मावळच्या शेतकऱ्यांचा विरोध; शेतकरी मेळाव्यात एकमताने ठराव

Maharashtra Live News Update: अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून झाली सुटका

Manoj Jarange : भुजबळ नाराज म्हणजे मराठा आरक्षणाचा जीआर पक्का - मनोज जरांगे पाटील

Symptoms of hypertension: ब्लड प्रेशर वाढलं की शरीरात होतात 'हे' बदल; उशीर होण्यापूर्वी धोके जाणून घ्या

SCROLL FOR NEXT