Akola News  Saam Digital
महाराष्ट्र

Akola News : संतापजनक! 9 वर्षांच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; मुख्याध्यापक, शिक्षक निलंबित

Akola Crime News : अकोला शहरालगतच्या गुडधी येथील जिल्हा परिषद शाळेत 9 वर्षांच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात हलगर्जी केल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकाला निलंबित केलं आहे.

Sandeep Gawade

अकोला शहरालगतच्या गुडधी येथील जिल्हा परिषद शाळेत 9 वर्षांच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता. 4 जून रोजी हा संतापजनक प्रकार घडला होता. चंद्रमणी चव्हाण या ५५ वर्षांच्या खिचडी शिजविणाऱ्या मदतनीसाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. आरोपीवर सिव्हिल लाईन पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी चंद्रमणी चव्हाण याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात हलगर्जी केल्याप्रकरणी आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकाला निलंबित केलं आहे.

शालेय पोषण आहार बनवणाऱ्या एका ५५ वर्षीय कर्मचाऱ्याने शाळेतील ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अकोला पोलिसांनी आरोपीविरोधात बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

आरोपी चंद्रमणी एका प्राथामिक शाळेत पोषण आहार बनवण्याचं काम करतो. शाळा उघडल्यानंतर ४ जुलै रोजी आरोपीने पीडित विद्यार्थिनीला खिचडी देण्याचं अमिष दाखलवून एका खोलीत नेलं. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर मुलगी दोन-तीन दिवस शाळेतच गेली नाही. मुलगी शाळेत जात नसल्याने आईने तिला याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला.

मुलीच्या आईने तातडीने शाळेत धाव घेऊन याबाबत मुख्याद्यापकांना जाब विचारला. प्रकरण शाळेत पोहचल्याचं कळताच आरोपी चंद्रमणीने फरार झाला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. आज मुख्याध्यापक आणि शाळेच्या शिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT