Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola : पुरी- अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफची कारवाई

Akola News : गांजा तस्करी व विक्री करण्यास बंदी असताना देखील चोरून याची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे अनेकदा समोर आला आहे. आता तर थेट रेल्वेतून गांजा तस्करी करण्यात येत असल्याचे अकोल्यात समोर आले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: गांजाची अवैधपणे तस्करी करण्यात येत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. यात थेट रेल्वेतून हि वाहतूक केली जात असताना अकोल्यात कारवाई करण्यात आली आहे. पुरी- अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करण्यात येत होती. अकोल्यात पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधून एकाला गांजाची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. 

अकोला रेल्वे आरपीएफने विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रेल्वे तपासणी केली असता एका बॅगमध्ये तीन पार्सल होते. त्यामध्ये गांजाची तस्करी केली जात होती. श्वान पथकाच्या माध्यमातून गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत जवळपास ६ किलो ३७० ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. अकोला रेल्वे स्टेशनवर आरपीएफ पथकाने एकाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. 

गुजरात विक्रीसाठी तस्करी 

दरम्यान ओडिसातून गांजा गुजरात मध्ये विक्रीसाठी नेला जात असल्याचे उघडकीस आले आहे. एका बॅगमध्ये पार्सल करून या गांजाची तस्करी केल्या जात होती. मात्र आरपीएफच्या शानपथकाद्वारे रेल्वेत मोहीम सुरू असताना, ही संशय बॅग दिसून आली होती. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड!
अकोल्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. गिरीश शोगोकार असं या चोरट्याच नाव आहे. त्याने अकोल्यातल्या सुधीर कॉलनी येथे घरफोडी करून सोन्यासह चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला होता. अखेर तपास दरम्यान पोलिसांना घरपोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात यश आले. त्याच्याकडून चोरी गेलेला ४ लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुंभमेळ्याच्या आखाड्यात शिवसेना शिंदे गटाचीही उडी

Thane Tourism : गोव्याहून सुंदर ठाण्यातील 'हा' समुद्रकिनारा, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

Pune News: १०० फूट उंच तेजस्वी प्रतिकृती! पुण्यातील दगडूशेठ मंडळाकडून यंदा केरळच्या मंदिराचा देखावा|VIDEO

EPFO खाते असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार? पण कसे? जाणून घ्या...

Monday Horoscope : स्पर्धात्मक वातावरणात प्रगती होईल, ५ राशींना मिळेल यश; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT