200 years old building  Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: मंदिरासाठी खोदकाम करताना जमिनीत आढळली २०० वर्षांपेक्षा जुनी इमारत; भिंतींवर होता 'राम' नामाचा उल्लेख

Akola: अकोल्यात श्री. राजराजेश्वर मंदिराचे काम सुरू आहे. मंदिराच्या आजुबाजूच्या परिसराचा विकास केला जातोय. त्यावेळी खोदकाम करत असताना जमिनीखाली भुयारीसारखी दिसणारी एक इमारत आढळून आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोला : येथील श्री. राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी खोदकाम चालू असताना जमिनीखाली इमारत आढळून आलीय. गेल्या काही दिवसांपासून श्री. राजराजेश्वर मंदिराचे काम सुरू आहे. मंदिराच्या आजुबाजूच्या परिसराचा विकास केला जातोय. त्यावेळी खोदकाम करत असताना जमिनीखाली भुयारीसारखी दिसणारी एक इमारत आढळून आली. ही इमारत २०० वर्षापेक्षा जास्त वर्ष जुनी असल्याचं म्हटलं जातं आहे.

अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. या अनुषंगाने श्री राजराजेश्वर मंदिराच्या मागे लागूनच असलेल्या शिकस्त झालेल्या जुन्या इमारतीला पडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आज सकाळी या ठिकाणी खोदकाम सुरू होतं दोनशे ते अडीचशे वर्ष जुने भुयार सारखी दिसणारी पुरातन इमारत जमिनीमध्ये आढळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान ज्या ठिकाणी खोदकाम सुरु आहे, हा परिसर पूर्ण असदगड किल्ला भागातला आहे. खोदकाम सुरू असलेल्या जागेपासून अगदी काही अंतरावर असदगड किल्ला आहे.

या भुयाराच्या आतमध्ये असलेल्या पुरातन दगडांवर खूप वर्षांपूर्वी जय बजरंग बली, जय भोलेनाथ तसेच जय श्री राम लिहिलेले सुद्धा आढळून आले, या भुयाराच्या आतमध्ये २ छोट्या खोल्या बनल्या असून या भुयारात अंधार झाल्यानंतर कंदील लावण्यासाठी सोय करण्यात आलीय. नेमके हे भुयार सारखे दिसणारी इमारत कशासाठी तयार करण्यात आली असावी याचा अंदाज सध्या लावता येणे शक्य नाही. पण या जमिनीखाली इमारत आढळून आल्याने त्याचं कुतूहल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Raigad Crime : सोशल मिडीयावरील ओळखीतून विवाहबाह्य संबंध; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या

Ankita Walawalkar Photos: 'रूपाची खान, दिसते छान' अंकिता वालावलकरचं सौंदर्य

Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

SCROLL FOR NEXT