Solapur News : मंदिर परिसरात उत्खननादरम्यान समाधीखाली सापडला मानवी सांगाडा, सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Human Skeleton Found Under Temple: हा मानवी सांगाडा हा प्राचीन काळातील असून नेमका कधीचा आहे याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे.
Solapur News
Solapur News saam tv

Solapur News : सोलापुरातील पोखरापूर येथे एका मंदिराच्या उत्खननाच्या कामादरम्यान एका समाधीखालील दगडी खोलीत मानवी सांगडा आढळा आहे. या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या संपादित क्षेत्रात पोखरापू येथे जगदंबा देवीच्या मंदिराचे पुनरोपण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी महामार्गाच्या पुलाचे काम चालू असताना मंदिर परिसरात उत्खनन करण्यात येत आहे.

Solapur News
Raj Thackeray Sabha : एक ही है लेकीन काफी है, राज ठाकरेंची ठाण्यात गर्जना; भाजपलाही दिला इशारा

या उत्खननादरम्यान जमिनीखाली एका समाधीच्या खाली दगडी बांधकामाच्या खोलीत मानवी सांगाडा आढळून आला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर दिवसभर मंदिर परिसरात उत्खनन करत असताना ग्रामस्थांनी गर्दी केली होती.हा मानवी सांगाडा हा प्राचीन काळातील असून नेमका कधीचा आहे याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. (Latest Marathi News)

Solapur News
Nana Patole : फसवा अर्थसंकल्प! शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मदतीचा भोपळा; नाना पटोलेंची सडकून टीका

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारपासून पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली मंदिराच्या परिसरातील उत्खनन करण्यात येत आहे. या कामादरम्यान दगडी बांधकामाच्या खोलीमध्ये एक मानवी शरीराचा सांगाडा आढळला. यानंतर पुरातत्त्व विभागाच्या वतीने या सांगड्याचे संशोधन सुरूकरण्यात आले आहे. (Solapur News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com