अकोला : उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली; अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol MItkari) यांनी मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagar Singh Koshyari) यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच राज्यपालांनी जातांना तरी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी अपेक्षाही मिटकरी यांनी व्यक्त केली. (Tajya Batmya)
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील महापुरषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीच्या रुपाने उशिरा का होईना महाराष्ट्रातील घाण गेली आहे. महापुरुषांचा अवमान केल्यामुळे राज्यपाल कोशियारी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी (Akola News) माफी मागितली नाही. आता जाता-जाता तरी माफी मागावी, अशी अपेक्षा आहे, असे आमदार मिटकरी म्हणाले.
भाजपच्या दुःखात सोबत
नवे राज्यभाल रमेश बैस यांच्या रुपाने झारखंडचे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहे. ते भगतसिंग कोश्यारी यांच्याप्रमाणे भाजपचे प्रतिनिधी म्हणून काम करणार नाही. महाराष्ट्राचा व येथील महापुरुषांचा ते सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे. कोश्यारीला परत बोलविण्याचे दुःख भाजपवर आले आहे. भाजपच्या या दुःखात आम्ही त्यांच्या सोबत आहे, असे आमदार मिटकरी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.