Amol Mitkari Saam tv
महाराष्ट्र

Amol Mitkari : मुख्यमंत्री पदावरून आमदार मिटकरींचे मोठं वक्तव्य; आषाढीच्या महापुजेबाबत व्यक्त केली इच्छा

Akola News : पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडे घालतांना अजित पवार यांना लवकरच मुख्यमंत्री कर, अशी आराधना केली. अनेकदा मिटकरींनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल ईच्छा बोलून दाखवली होती

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या नाही पण पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना सपत्निक मिळावा; असं साकडं मिटकरींनी विठ्ठलाला घातलं. एरव्ही सध्या महायुतीत मुख्यमंत्री पदावरून कोणतीच चर्चा नसतांना मिटकरींच्या या वक्तव्यावरून महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अकोल्यातल्या आरोग्यनगर भागातील अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी आज संत रूपनाथ महाराजांची पालखीचे आगमन झाले. दहीहांडा येथील संत रूपनाथ महाराजांच्या पंढरपूर पालखीचं हे पहिलंच वर्ष आहे. यावेळी मिटकरींनी पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडे घालतांना अजित पवार यांना लवकरच मुख्यमंत्री कर, अशी आराधना केली. दरम्यान याआधी अनेकदा अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल आपली ईच्छा बोलून दाखवली होती.

भाजपच्या मंत्र्यांवर व्यक्त केली नाराजी 

महायुतीतील भाजपचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याबद्दल त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजीचा सूर आहे. आशिष शेलार तीन महिन्यांपासून भेटीचा वेळ देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एक्स पोस्टद्वारे केली होती. या तक्रारीवरून मिटकरी यांनीही आशिष शेलार यांच्याबद्दल एक्स पोस्ट करीत नाराजी व्यक्त करत आपल्यालाही शेलार यांचा असाच अनुभव आल्याचा आमदार मिटकरी यांनी म्हटले आहे. विशिष्ट सेलिब्रिटींना महिन्यातून तीनदा भेटणारे शेलार मात्र मित्र पक्षाच्या कार्यकर्ते नेत्यांना वेळ का देत नाहीत? असा सवालही आमदार मिटकरी यांनी केला.

उद्धव ठाकरेंवर उधळली स्तुतीसुमने
दरम्यान आमदार  मिटकरी यांनी आज दोन्ही शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र ठाकरे गटाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली. उद्धव ठाकरेंनी आणखी महाराष्ट्राची सेवा करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आणि शिवसेने प्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला आपुलकी आणि आदर असल्याचे मिटकरी म्हटले. त्यांना महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणखी बळ मिळावं, अशा सदिच्छा मिटकरींनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT