Marriage News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: बोलणीनंतर पाच दिवसांनी मागितला हुंडा; हुंडा दिला नाही म्हणून मोडले लग्न

बोलणीनंतर पाच दिवसांनी मागितला हुंडा; हुंडा दिला नाही म्हणून मोडले लग्न

जयेश गावंडे

अकोला : साक्षगंधानंतर हुंड्याची‎ मागणी केली. तो देण्यास मुलीचे‎ वडील असमर्थ असल्याने नवऱ्या‎ मुलाकडील मंडळीने (Marriage) लग्नास नकार‎ दिला. या प्रकरणी मुलीच्या‎ वडिलांच्या तक्रारीवरून रामदासपेठ‎ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.‎ (Maharashtra News)

मोहता मिल गोरक्षण रोड येथील‎ एका युवतीची सोयरीक नागपूर‎ येथील युवक पंकज युहुदास बेलेसोबत झाली. त्यानंतर ४ डिसेंबर‎ २०२२ ला लग्न जुळवण्याचा‎ कार्यक्रम मुलीच्या घरी ठरला होता.‎ यावेळी वर मुलगा पंकज, त्याची‎ आई शोभा, त्याच्या बहिणी,‎ मध्यस्थ भीमराव बहादुरे उपस्थित‎ होते. त्याच दिवशी मुलीचा बस्ता‎ मुलीकडचे, मुलाचा बस्ता‎ मुलाकडचे घेतील, असे ठरले होते.‎ याच दिवशी साक्षगंधही केले.

पाच दिवसांनी फोन करून हुंड्याची मागणी

लग्नाची‎ तारीख सोयीनुसार तीन -चार‎ दिवसांत कळवतो; असे सांगून‎ मुलाकडचे निघून गेले. मात्र पाच‎ दिवसानंतरही निरोप आला नाही.‎ दरम्यान हुंडा दिला‎ तर लग्न करतो, असे त्यांचे म्हणणे‎ असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र ही‎ रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांनी‎ विनवणी केली.

वर मुलासह आईवर गुन्‍हा

मात्र हुंडा‎ दिल्याशिवाय ऐकणारच नाही; असा‎ पवित्रा घेतल्याने आपण हुंडा देऊ‎ शकलो नाही. म्हणून मुलीचा विवाह‎ होऊ शकला नाही, अशी आपबिती‎ मुलीच्या वडिलाने रामदासपेठ‎ ठाण्यात सांगितली. पोलिसांनी वर‎ मुलगा पंकज व त्याची आई शोभा‎ युहुदास बेले यांच्याविरूद्ध हुंडाबंदी‎ अधिनियमा नुसार गुन्हा‎ दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT