Akola Crime News: Saam TV
महाराष्ट्र

Akola News: दुहेरी हत्याकांडाने अकोला हादरलं, पत्नीसह ९ वर्षाच्या मुलीला पतीने गाढ झोपेतच संपवलं

Akola Crime News: नांदायला येत नसल्याचा राग मनात धरुन पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह ९ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या केली. ही धक्कादायक घटना अकोला शहरात घडली.

Satish Daud

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

Akola Husband Killed wife and Daughter

नांदायला येत नसल्याचा राग मनात धरुन पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह ९ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या केली. ही धक्कादायक घटना अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

रश्मी म्हात्रे (वय २७) आणि माही म्हात्रे (वय ९) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मनीष म्हात्रे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष आणि रश्मी यांच्यात नेहमी वाद होत होता.

पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून रश्मी माहेरी निघून गेली होती. पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात होता. पती मनीष म्हात्रे हा अनेकदा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी जात होता. परंतु मनधरणी करुनही पत्नी सासरी नांदायला येण्यास नकार देत होती.

दरम्यान, मंगळवारी (ता. २३) म्हात्रे कुटुंबात लग्न असल्याने रश्मी आणि मुलगी माही हे दोघेही जण अकोल्यात सासरी आले होते. रात्री उशिराही मनीषनं पत्नीला सासरी राहायला म्हटलंय, पण तिने नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी मनीषने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

या घटनेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकचा तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे करीत आहेत.

७ दिवसांआधीही अकोल्यात दुहेरी हत्याकांड

मागील ७ दिवसांपूर्वी अकोल्यातल्या रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत अतुल थोरात आणि राज गायकवाड यांची धारदार शास्त्रांनी हत्या करण्यात आली. रेल्वे स्टेशन आणि देशमुख फ़ैल चौकात ही हत्या झाली. तिघांनी अतुल आणि राजवर धारदार शास्त्रान वार करून जागीच संपवलं.

रामदास पेठ पोलिसांनी २४ तासात तिनही आरोपींना गजाआड केलं असून मारेकरी मनीष भाकरे, ऋषिकेश आपोतीकर आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. अगदी शुल्लक करून या तिघांनी अतुल आणि राजला संपवलं होतं. दरम्यान आता पुन्हा अकोला आजच्या दुहेरी हत्येनं हादरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT