Akola Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Akola Accident News: कारची दुचाकीला जबर धडक; भीषण अपघातात पती-पत्नी ठार

Accident News: अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाटा येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola News: अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाटा येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवलाल पतींगे आणि मीना शिवालाल पतिंगे अशी अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा येथे एक कार्यक्रमासाठी आले होते. (Latest Marathi News)

दरम्यान, दापुरा फाट्याजवळ भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात (Accident) एवढा भीषण होता की, पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. धडक देणाऱ्या वाहन चालकाने तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती तेल्हारा पोलिसांना (Police) देण्यात आली. त्यानंतर तेल्हारा पोलीस घटनस्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी गाडीचे नंबर बोनेट पडल्याने त्या आधरे तेल्हारा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी काही काळासाठी हा रोड अडविला होता. त्यामुळे अनेक तास वाहतूक खोडबली होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. (Akola Accident News)

भरधाव ट्रकची ट्रॅव्हल्सला मागून धडक!

पुणे-बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर १८ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली.

अपघातग्रस्त बस ही खासगी कंपनी निता ट्रॅव्हल्सची असून ती रात्री प्रवाशांना घेऊन कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. तसेच ज्या ट्रकने बसला धडक दिली तो मालवाहतूक करणारा मोठा ट्रक होता. या ट्रकमध्ये साखरेचे पोती भरलेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार, हिना गावित यांची आज घरवापसी

Maharashtra Live News Update: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

Heart blockage: मान किंवा जबड्यामध्ये वेदना होतायत? हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्यापूर्वी पाहा कोणते 5 संकेत मिळतात

Nilesh Sable : निलेश साबळेचा नवाकोरा शो; लाडक्या वहिनींसाठी भन्नाट गिफ्ट, नावही आहे खास

Shocking News : कंपनी मॅनेजरची कर्मचारी महिलेवर वाईट नजर, बलात्कार करून खंडणी उकळली, बायकोचीही नवऱ्याला साथ

SCROLL FOR NEXT