Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : तरुणांकडून सततच्या त्रासातून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; अकोल्यातील धक्कादायक घटना

Akola News : राज्यात लहान मुलींवरील अत्याचार झाल्याच्या घटना ताज्या असताना अकोल्यात हि धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : तरुणाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हि खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत घडली. या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

राज्यात लहान मुलींवरील अत्याचार झाल्याच्या घटना ताज्या असताना अकोल्यात हि धक्कादायक घटना समोर आली आहे. (Akola) अकोला जिल्ह्यातील एका गावात वास्तव्यास असलेली पीडित मुलगी दररोज शिक्षणानिमित्ताने मुर्तिजापूरला जात होती. या दरम्यान एका मुलाकडून त्या मुलीला धमक्या देऊन मार- ठोक करुन बळजबरी फोटो काढले. या प्रकारामुळे ती घाबरली असून तिने काहीच (Crime News) सांगितले नाही. गावात आपलं एकटंच घर. घरी सांगितले तर भांडणं होतील, असा विचार करुन तिने घरात फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक घेतले. यातून तिची प्रकृती अत्यवस्थ झाली.  

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला  लागलीच रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी मुलीने त्या युवकाचे नाव घेत त्याच्या त्रासामुळेच मुलीने विष घेतल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. या युवतीवर सध्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर म्हणजे तीन दिवस होत आले तरी पोलिस कारवाई झाली झाली नाहीये, असा आरोपी मुलीच्या वडिलांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT