Bhima River Flood : पंढरपुरात भीमा नदीला पूर; १०० कुटुंबांचे करणार स्थलांतर

Pandharpur News : पंढरपूरमधील भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून आज सकाळी नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीत जाऊन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी पाहणी केली
Bhima River Flood
Bhima River FloodSaam tv
Published On

पंढरपूर : मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे पंढरपूर शहरामध्ये दुपारनंतर भीमा नदीच्या पाण्याची पातळी ही वाढणार आहे. त्यामुळे शंभर कुटुंबांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनांना तयारी केली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्यावतीने यातील २५ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

Bhima River Flood
Jalgaon News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

पंढरपूरमधील (Pandharpur) भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून आज सकाळी नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीत जाऊन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी पाहणी केली. उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा नदीने सध्या इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या (Bhima River) भीमा नदी धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाहत आहे. दरम्यान आज दुपारनंतर पंढरपूरमध्ये एक लाख पन्नास हजार क्युसेक इतकं पाणी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Bhima River Flood
Beed Vidhan Sabha : बीड विधानसभेच्या रिंगणात आणखी एक क्षीरसागर?; संधी मिळाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका

भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे आणखीन काही सखल भागात नदीचे पाणी शिरणार आहे. त्यामुळे आज शंभर कुटुंबाचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनांनने सुरू करण्यात आली आहे; अशी माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे. याच्या हालचाली सकाळपासूनच सुरु करण्यात आल्या आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com