Beed Vidhan Sabha
Beed Vidhan SabhaSaam tv

Beed Vidhan Sabha : बीड विधानसभेच्या रिंगणात आणखी एक क्षीरसागर?; संधी मिळाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका

Beed News : माजी मंत्री काका जयदत्त क्षीरसागर, विद्यमान आमदार पुतण्या संदीप क्षीरसागर, नगरसेवक पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांची बीड विधानसभेसाठी तयारी सुरु आहे
Published on

बीड : बीड विधानसभेच्या रिंगणात अगोदरच काका आणि दोन पुतणे अशा तीन नावांची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आता पुन्हा एका क्षीरसागर कुटुंबातील सदस्याची बीड विधानसभेच्या उमेदवारीच्या चर्चेत एन्ट्री केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ही उमेदवारी असण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार यांनी संधी दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची भूमिका डॉ. सारिका क्षीरसागर यांनी मंडळी आहे. 

Beed Vidhan Sabha
Palghar News : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; पालघरच्या अस्वाली धरणातील घटना

माजी मंत्री काका जयदत्त क्षीरसागर, विद्यमान आमदार पुतण्या संदीप क्षीरसागर, नगरसेवक पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांची (Beed) बीड विधानसभेसाठी तयारी सुरु आहे. त्यात आता डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र आगामी काही दिवसात उमेदवारी निश्चित झाल्यानंतर बीड मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार आहे. 

Beed Vidhan Sabha
Jalgaon News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

दरम्यान सारिका क्षीरसागर यांनी सांगितले, कि खूप कमी महिला राजकीय क्षेत्रात सक्रीय असतात. त्यामुळे चर्चा जास्त होत असेल, पण माझ्यासारख्या अनेक महिला पक्षात सक्रीय आहेत. उमेदवारीबाबत अजितदादांचा (Ajit Pawar) निर्णय असणार आहे. त्यांनी जर मला सांगितले की इथून महिला उमेदवार पाहिजे तर मी का तयार नसेन? असे वक्तव्य बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या डॉ. सारीका क्षीरसागर यांनी केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com