Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक

Akola Crime News : जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलींना नदीत फेकून दिल्याची संतापजनक घटना अकोला शहरातील बाळापूर परिसरात घडली.

Satish Daud

जन्मदात्या बापानेच पोटच्या 2 अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार अकोला येथील बाळापूर परिसरात घडला. शनिवारी (ता. ५) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला. बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. आलिया आणि सदफ असं मृत्युमुखी पडलेल्या सख्खा बहि‍णींची नावे आहेत.

मृत मुलींच्या नातेवाईकांनीच म्हणजेच वडिलांनी हे कृत्य केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. त्या आधारावर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं आहे. शेख हारून असं आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी आपल्या वडिलांसोबत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. बराच वेळ होऊन त्या घरी परतल्या नाहीत.

मुलींना अटाळी येथून ऑटो रिक्षात बसून दिले होते, असा बनाव मुलींच्या वडिलांनी कुटुंबियांसमोर केला. अखेर कुटुंबियांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केलेली होती. मात्र पोलिसांनी शेख हारून यावरच शंका आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपल्या मुलींना नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तपासादरम्यान वडिलांनी मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलाचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी बचावपथकाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी निर्दयी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT