Arunkumar Vora Kidnappe Case Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: व्यावसायिक अरुणकुमार वोरा अपहरण प्रकरण, पोलिसांनी ५ जणांना ठोकल्या बेड्या

Priya More

अक्षय गवळी, अकोला

'काच बॉटल सप्लायर' प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांच्या अपहरण प्रकरणात (arunkumar vora kidnappe case) मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अकोला पोलिसांना मोठे यश आले आहे. अरुणकुमार यांचे अपहरण करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी (Akola Police) आरोपींकडून मुद्देमालासह दोन देशी कट्टे जप्त केले आहेत. आरोपींनी अपहरणकर्त्यांकडून १ कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणकुमार यांच्या अपहरण प्रकरणात मुख्य आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे यांच्यासह ५ जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून गुह्यात वापरण्यात आलेली कार आणि दोन बनावट देशी कट्टे तसेच चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. अरुणकुमार यांच्या अपहरणकर्त्यांनी १ कोटी रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

किशोर दाभाडे, फिरोज खान युसूफ खान, शरद पुंजाजी दाभाडे, अशिष अरविंद घनबाहादूर, राजा सरफराज खान, चंदू इंगळे या ७ जणांनी व्यासायिक अरुणकुमार वोरा यांचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून दोघे जण फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींनी अरुणकुमार वोरा यांचे अपहरण केल्यानंतर अकोल्यातल्या चिवचिव बाजारात आणि दुसऱ्या दिवशी कान्हेरी भागात एका खोलीत दोरीनं बांधून ठेवले होते. तसेच त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवले होते. आरोपींनी अरुणकुमार यांना बेदम मारहाण देखील केली होती.

दरम्यान, सोमवारी रात्री अरुणकुमार वोरा हे आपले दुकान बंद करून घराकडे जात होते. त्यांना रस्त्यामध्ये अडवून आरोपींनी सिनेस्टाइल पद्धतीने त्यांचे अपहरण केले. अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चारजिन कम्पाऊंड परिसरातून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. बंदूक आणि धाकधार शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी अकोला पोलिस शोध घेत होते. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. आरोपींनी स्वत:च अरुणकुमार यांना एका कारमध्ये बसवून त्यांच्या घराच्या दिशेने पाठवून दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT