Manasvi Choudhary
मेकअप कितीही चांगला केला तरी लिपस्टिक नसेल, तर लूक अपूर्ण वाटतो. यासाठी बेस्ट लिपस्टिक महत्वाची आहे जी एकदा लावल्यानंतर सकाळपासून रात्रीपर्यंत टिकून राहील आणि ओठांचे सौंदर्य अधिक खुलवेल.
महिलांसाठी सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या बेस्ट लिपस्टिक शेड्स कोणत्या ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अनेकदा मॅट लिपस्टिक लावल्यामुळे ओठ कोरडे पडतात, पण हायड्रेटिंग मॅट लिपस्टिक ओठांना तडे जाऊ न देता एक मुलायम आणि फ्रेश फिनिश देते. रोजच्या ऑफिस किंवा कॉलेज वापरासाठी बेस्ट आहे.
जर तुम्हाला थोडा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक हवा असेल, तर कोको क्रश शेड अत्यंत परफेक्ट ठरते. ऑफिस मीटिंग असो वा संध्याकाळची नाईट पार्टी, हा शेड तुमच्या लूकला एक रिच आणि क्लासी फील देतो.
मल्टीपर्पोज युजसाठी बेस्ट आहे. ही लिपस्टिक तुम्ही ओठांसोबतच गालांवर हलकासा ब्लश म्हणूनही वापरू शकता, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी टवटवी दिसते.
पारंपारिक साडी किंवा ट्रेडिशनल वेअरवर गडद मरून रंगाची मॅट लिपस्टिक नेहमीच उठून दिसते. हा शेड भारतीय स्किन टोनवर अत्यंत आकर्षक आणि राजेशाही लूक देतो.
नो-मेकअप लूकसाठी किंवा सोबर लूक हवा असल्यास न्यूड पिंक शेड बेस्ट आहे. हा शेड सर्व प्रकारच्या आऊटफिट्सवर अगदी सहज मॅच होतो.