Manasvi Choudhary
अनेकदा आपल्याला साडी नेसायची असते पण त्या रंगाचा पेटीकोट आपल्याकडे नसतो. प्रवासात असलो की पेटीकोट घरी विसरतो किंवा कपाटात पेटीकोट भेटतच नाही, अशावेळी नेमकं काय करावे असा प्रश्न महिलांना पडतो. अनेक महिला साडी नेसण्याचा प्लान रद्द करतात.
मात्र आज आम्ही तुम्हाला पेटीकोट नसेल तर तुम्ही साडी नेसू शकाल. अशा काही सोप्या साडी नेसण्याच्या स्टेप्स सांगणार आहोत. आजकाल, पारंपरिक पेटीकोटच्या पलीकडे जाऊन साड्या विविध प्रकारे स्टाईल करता येतात. विशेषतः, साडीसोबत विविध स्टायलिश पॅन्ट्सचा वापर करू शकता.
जर तुमच्याकडे पेटीकोट नसेल, तर साडीखाली लेगिंग्ज, फिटिंगचे पलाझो, स्ट्रेट-कट पँट्स किंवा शेपवेअर यांसारखे पर्याय तुम्ही वापरू शकता. यासाठी, सर्वात महत्वाचे म्हणजे साडीचे कापड, रंग, पारदर्शकता हे देखील महत्वाचे आहे.
जर तुमच्याकडे पेटीकोट नसेल, तर व्यवस्थित फिटींगची लेगिंग्स तुम्ही वापरू शकता. साडीच्या रंगाचे लेगिंग्स तुम्ही साडीसोबत घालू शकता.
जर तुम्हाला पारंपरिक लूक हवा असेल, तर तुम्ही साडीसोबत फिटिंगची स्ट्रेट-कट पँट घालू शकता. हा लूक विशेषतः सुती, लिनन किंवा स्ट्रक्चर्ड साड्यांवर चांगला दिसतो.
साडीसाठी तुम्ही योग्य शेपवेअर निवडा जो तुमच्या शरीराच्या आकारानुसार फिट बसते. मात्र, शेपवेअर जास्त घट्ट नसेल याची खात्री करा; शेपवेअर असा निवडा जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. सहजपणे हालचाल करता येईल.
आजकाल तरूणी, मुली साडी नेसण्यासाठी प्लाझो निवडा. खूप घेरदार पलाझोऐवजी, तुमच्या साडीसोबत स्ट्रक्चर्ड पलाझो तुम्ही वापरू शकता. इंडोवेस्टर्न लूकसाठी हा पॅटर्न अत्यंत बेस्ट आहे.