Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: मुलीच्‍या लग्‍नासाठी परिवार बाहेर; शेजाऱ्यांचे धक्‍कादायक कृत्‍य

मुलीच्‍या लग्‍नासाठी परिवार बाहेर; शेजाऱ्यांचे धक्‍कादायक कृत्‍य

जयेश गावंडे

अकोला : शेजारी म्हटलं की संकटकाळी मदतीला धावणारा. अनेकदा बाहेर जायचे असल्‍याने शेजाऱ्याच्‍या भरोवशावर जात असतो. परंतु, मुलीचे लग्‍न (Marriage) असल्‍याने परिवार बाहेर गेला असताना शेजाऱ्यानेच घरात चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Akola) अकोल्यातील बाळापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. (Tajya Batmya)

बाळापूर शहरातील जैन मंदिरात फिर्यादी संजय श्रीधर देशमुख यांच्या मुलीचे लग्न होते. त्यामुळे राहत्या घराला कुलूप लावून कुटुंबीय गेले होते. दरम्यान, कुटुंबीय परत आले चोरट्यांनी घराच्या भिंतीवरून आत प्रवेश करून एकूण 69 हजार 250 रुपयांचा ऐवज (Crime) लंपास केला होता. बाळापूर पोलिसांनी (Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मुद्देमालासह आरोपी अटकेत

मुलीच्या लग्न समारंभात व्यस्त असताना कुटुंबाच्या घरात घुसून चोरट्यांनी नगदी व सोन्या- चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला. पोलिस तपासानंतर शेजारी राहणारे रामा लक्ष्मण सोनकर, श्रीकांत शिवराम किल्लेकर यांना बाळापूर पोलिसांनी शिताफीने अटक करून मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता बाळापूर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोसळधार! राज्यात पावसाचे ७ बळी; मराठवाड्यात ११ जण बेपत्ता, कुठे कशी परिस्थिती?

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

Kisan Vikas Patra: ११५ महिन्यात पैसे होणार डबल; किसान विकास पत्र योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानजींचे हे उपाय तुम्हाला करतील मालामाल, आर्थिक तंगी होईल दूर

SCROLL FOR NEXT