Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: पोलिस अधिकारी दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याला नाही तसलं बोलला, शिवीगाळ करत धमकी दिली

Akola Viral Video: अकोल्यातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अकोल्यात एका पोलिस अधिकाऱ्यानेच दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले आहे.

Siddhi Hande

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक ठिकाणी शाब्दिक बाचाबाची होताना दिसते. त्याचसोबत हाणामारीचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु जर पोलिस अधिकारीच जर भांडण करत असेल तर... सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिस अधिकारी दारुच्या नशेत एका वैद्यकीय अधिकाऱ्याशी भांडताना दिसत आहे. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

PSI अर्थातच पोलिस अधिकारी आणि एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचा शाब्दिक वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय..या व्हिडिओमध्ये पीएसआय अर्थातच पोलीस अधिकारी दारूच्या नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करत निलंबनाच्या कारवाईची धमकी देत आहे, असा आरोप करीत या वैद्यकीय अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रार केलीय.. तू आरोग्य देण्यात हजर का राहत नाही? या कारणांवरून या दोघांमध्ये हा शाब्दिक झाल्याचे बोलल्या जातऐ..

दरम्यान, अकोल्यातील दहीहंडा आरोग्य प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर आणि दहीहंडा पोलीस स्टेशनचे PSI प्रभुदास गंडलिंगे यांचा वादाचा हा video सर्वत्र वायरल होत आहे.. गंडलिंगे या पीएसआयने शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची वाद घालत 'तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाही?', असा सवाल विचारत थेट डॉक्टराला शिवगाळ घातलीय,इतकंच नाही तर पुढं निलंबनाच्या कारवाईची धमकी दिलीय. असा आरोप या डॉक्टराने तक्रारीतून केलाय.

या पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याची तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्याने अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांकडे केलीय.. शिवीगाळ करणाऱ्या पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी आता या डॉक्टराकडून होत आहे. नेमकं आता संपूर्ण प्रकार नंतर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT