Sakshi Sunil Jadhav
4 ते 5 पापड, 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या घ्या आणि बारीक चिरून ठेवा.
हळद, लाल तिखट, धणे पावडर, मीठ आणि थोडी साखर चवीनुसार तयार ठेवा.
आता कढईत 1 ते 2 चमचे तेल गरम करून जिरं आणि मोहरी टाका.
चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्या.
आता फोडणीत हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.
पुढे हळद, तिखट, धणे पावडर आणि मीठ घालून नीट मिक्स करा. गॅस स्लो ठेवा.
शेवटी थोडं पाणी घालून ग्रेव्ही तयार करा आणि 2 ते 3 मिनिटं उकळू द्या.
पापडाचे तुकडे करून शेवटी घाला आणि 1 ते 2 मिनिटं हलक्या हाताने शिजवा.
तुम्ही आता वरून कोथिंबीर घालून गरमागरम भाजी भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करू शकता.