Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांवर रानडुकराचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांवर रानडुकराचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

जयेश गावंडे

अकोला : मोकड्या मैदानात सर्व मुले क्रिकेट खेळत होते. याच वेळी अचानक क्रिकेट (Cricket) खेळत असलेल्‍या मुलांवर रानडुकराने हल्‍ला केला. या रानडुकरांच्या हल्ल्यात मदरशातील विद्यार्थ्यांसह तिघे जण जखमी झाले. (Live Marathi News)

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील कासारखेड परिसरातील आजमपुरा येथील मदरशातील हा प्रकार आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. खुल्या मैदानात मदरशातील विद्यार्थी क्रिकेट खेळत असताना रानडुकराने १४ वर्षीय विद्यार्थी शेख सादील शेख समीर याच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या सै. तैसिफ सै. सादीक (वय ३०) व शेख नबी शेख महेमुद (वय ६०) यांच्यावर देखील रानडुकराने हल्ला केल्याने ते जखमी झाले.

जखमी रुग्णालयात

शेख सादील हा बाहेरगावचा विद्यार्थी मदरशात शिक्षण घेत आहे. दरम्यान मदरशातील काही विद्यार्थी क्रिकेट खेळत होते. अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. रानडुकराच्या या हल्ल्यात अडकलेल्या विद्यार्थ्याला सोडवण्यासाठी दोघांनी तिथे धाव घेतली. मात्र रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला ते दोघेही या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्या उपचार सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार मदरशातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. दरम्यान जखमींवर तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT