Akola News Saam tv
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

Akola News : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाली होती

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : विधानसभा निवडणुकीत बहुतेक मतदारसंघात बंडखोरी झाली होती. या बंडखोरीचा फटका अकोल्यामध्ये भाजपला बसला आहे. यामुळे अकोल्यात काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झाले असून अकोला पश्चिमचे भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव केला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाली होती. यात अकोला पश्चिम मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी करण्यात आली होती. याचाच फटका भाजप उमेदवाराला बसला आहे. दरम्यान (Akola News) अकोला पश्चिम मतदारसंघामधून २२ व्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार साजिदखान पठाण १२८३ मतांनी विजयी झाले आहेत. 

दरम्यान, काँग्रेसचे साजिद खान पठाण हे विजयी झाले आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार हरीश अलीमचंदानी अशोक ओळंबे यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांना मोठा फटका बसला आहे. बंडखोर उमेदवार अलीमचंदानी यांनी २१ हजारांहून जास्त मत घेतल्याने भाजपाला अकोला पश्चिममध्ये मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT