Akola Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Akola Bajar Samiti : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद; कामगाराचे कामबंद आंदोलनाचा फटका

Akola News : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 'श्रमिक संघ दाणे'वाला संघटनेनं आजपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. महिला आणि पुरुष मदतनीस कामगारांनी विविध मागण्यासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव कामगारांच्या आंदोलनामुळे बंद पडले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या पुरुष आणि महिला कामगारांना कामगार परवाना मिळावा आणि वेतन वाढावं यासाठी ४०० कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. (Maharashtra News)

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 'श्रमिक संघ दाणे'वाला संघटनेनं आजपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. महिला आणि पुरुष मदतनीस कामगारांनी विविध मागण्यासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागील ७ वर्षाअगोदर २ रुपये किलो तर १ रूपये २० पैसे व्यापाऱ्यांकडून वेतन म्हणून पैसे दिले जात होते. परंतू आता कोणताही मोबदला मिळत नाही. सध्या महागाई वाढली असून मिळत असलेला दाणाही बाहेर घेऊन जाता येत नाही. त्यामुळे ३०० ते ४०० कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने कामगारांनी हे बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलनामुळे शेतमालाचे लीलाव  बंद पडल्याने विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होतो आहे. अडते मध्ये दानेवाला, मदतनीस कामगारांना अन्नसोड झालेला शेतकऱ्यांचा मोबदला द्यावा. चाळणी, सुकवाई तसेच व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेला माल दुसऱ्या दिवशी वाहनात लोड करताना मोबदला द्यावा, विशेष म्हणजे कामगार परवाना मिळाला पाहिजे. या मागणीसाठी हे उपोषण पुकारल गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

Sanjay Dutt : सोनं, लाखोंचं घड्याळ अन् बरंच काही; संजय दत्तला पाकिस्तानी चाहत्याकडून महागड्या भेटवस्तू

SCROLL FOR NEXT