Zilha Parishad School Saam tv
महाराष्ट्र

Zilha Parishad School : जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय; तर आळंदा ग्रामस्थांना पाणी व घरपट्टी कर माफ

Akola News : ग्रामपंचायत निर्णय घेतल्यानंतर आळंदा जिल्हा परिषद शाळेला मोठा फायदा झाला. यंदा या शाळेमध्ये १२ विद्यार्थ्यांची पट संख्या वाढली. आळंदा पाठोपाठ महान आणि तेल्हारा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने निर्णय लागू केला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट झाली आहे. शाळेत विद्यार्थी मिळत नसल्याने पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडत आहेत. अशात जिल्हा परिषद शाळा सुरु ठेवण्यासाठी अकोला जिल्ह्यातील आळंदा ग्रामपंचायतने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यात जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांचा प्रवेश घेतल्यास त्यांना पाणी व घरपट्टी कर माफ करण्यात येणार आहे. 

शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उल्लेखनीय निर्णय घेत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला आहे. बहुतांश ठिकाणी विद्यार्थी नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत किंवा त्या शाळांचे अन्य ठिकाणी विलगीकरण केले जात आहे. याच अनुषंगाने अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा ग्रामपंचायतीने पुढाकार घेत पाल्यांचा प्रवेश घेणाऱ्याला पालकांना पाणी पट्टी व घरपट्टी कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

निर्णयानंतर १२ विद्यार्थ्यांचा प्रवेश 

ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभा व सरपंच दत्ता ढोरे यांच्या नेतृत्त्वात घेण्यात आला. विशेष म्हणजे निर्णय घेतल्यानंतर आळंदा जिल्हा परिषद शाळेला मोठा फायदा झाला. यंदा या शाळेमध्ये १२ विद्यार्थ्यांची पट संख्या वाढली आहे. आळंदा ग्रामपंचायतने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. इतकेच नव्हे तर आळंदा पाठोपाठ महान आणि तेल्हारा तालुक्यातील आणखी एका ग्रामपंचायतीने असा निर्णय लागू केला आहे. 

शिक्षण मंडळाकडूनही स्वागत 
गावातील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता, शिस्तबद्ध कामकाज आणि शैक्षणिक प्रगती लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच दत्ता ढोरे म्हटले आहे. आळंदा गावचे उपसरपंच विश्वनाथ जानोरकर, ग्रामपंचायत सदस्य दयाराम खाडे, ज्ञानेश्वर सुलताने, सागर मोहोड, सुरेखा बेद्रे, सोनाली नवलकार आणि ग्रामसेवक स्वाती उंबरकार यांच्या उपस्थित ठराव मंजूर करण्यात आला. आळंदा ग्राम मंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे गावात शैक्षणिक वातावरणात पसरल आहे. या निर्णयाच गावाकर्यांसह अकोल्यातील शिक्षण विभागाने देखील स्वागत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard : पुण्यानगर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

SCROLL FOR NEXT