Corona Virus : अकोल्यात कोरोनाचा शिरकाव; शहरात आढळले दोन रुग्ण

Akola News : राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूर पाठोपाठ आता विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नवीन व्हेरिएंट घातक नसला तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
Corona Virus
Corona VirusSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान अकोला शहरात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून अकोला महापालिका क्षेत्रात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहे. या दोन्ही रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत. दरम्यान महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूर पाठोपाठ आता विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट अधिक घातक नसला तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान राज्यात रोज नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी रुग्ण आढळून येत असल्याने राज्याची आरोग्य यंत्रणेकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

Corona Virus
Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा; ८ जूनपासून बच्चू कडू बसणार बेमुदत उपोषणाला

अकोल्यात शिरकाव 

अकोला शहरात अर्थातच अकोला महापालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. शहरात दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असून त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती अकोला शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मीनाक्षी गजबीये यांनी दिली आहे. 

Corona Virus
Bribe Case : वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच; दोन महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

काळजी घेण्याचे आवाहन 

दरम्यान अकोल्यातही कोरोना रिटर्न होतांना दिसून आला. त्यामुळे अकोल्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या अनुषंगाने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने अकोलकरांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com