अकोला : एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील समस्या जैसे थे असल्याचे वास्तव आहे. अकोल्यातील (Akola) बाळापूर तालुक्यातल्या खिरपूरी बु. येथे स्मशानभूमीकडे ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना जगण्याने तर छळले, पण मृत्यूनंतरही समस्येतून सुटका झाली नसल्याचे वास्तव आहे. अंत्यसंस्कारासाठी (Funeral) ग्रामस्थांना नाल्याच्या कंबर एवढ्या पाण्यातून वाट शोधावी लागत असल्याचे चित्र आहे. (Akola Today News)
खिरपूरी बु. येथे स्मशानभुमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. यामुळे मृतदेह नेताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गावात गेल्या कित्येक वर्षापासून सुविधांचा अभावच दिसून येत आहे. येथे स्मशानभूमीकडे ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने पावसाळ्यात (Rain) नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या संततधार पाऊस सुरू असून, जिकडे- तिकडे पाणीच पाणी आहे.
बावीस वर्षांपासून पुलाची प्रतिक्षा
स्मशानभूमीच्या रस्त्याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी मृतदेह नेताना नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कंबर एवढ्या पाण्यामधून नागरिकांना वाट शोधावी लागते. सन 2002 मध्ये स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. गेल्या २२ वर्षांपासून या नाल्यावर पूल व रस्त्याचे काम करण्यात आले नसल्याने मेल्यानंतर ही प्रेताचे हाल होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.