Nandurbar: पाच हजार वृक्ष लागवड; पोलीस दलातर्फे शहादा उपक्रम

पाच हजार वृक्ष लागवड; पोलीस दलातर्फे शहादा उपक्रम
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहादा येथे नंदुरबार पोलीस दलातर्फे पाच हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. नाशिक (Nashik) विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते डोंगरगाव येथील एका पडीक जागेवर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. (Nandurbar News Tree Plantation)

Nandurbar News
Nagpur Crime : नागपुरातून ७ महिन्यांत ९५८ महिला बेपत्ता; नेमकं कारण काय?

पोलीस (Police) दलातर्फे आयोजित पाच हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाला परिसरातील पाच हजार विद्यार्थी उपस्थित होते. बिरसामुंडा चौफुली ते महावीर स्कुलपर्यत विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा तीन किलोमीटरपर्यत (Nandurbar) मानवी साखळी तयार केली होती. यानंतर या शाळेच्या प्रांगणात मान्यवराच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

मंडळांचा सत्‍कार

या कार्यक्रमात गेल्या वर्षभरात डीजे मुक्त सण कार्यक्रम करणाऱ्या सार्वजनिक मंडळांचा पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात तिरंगा व ओठी भारत मातेच्या जयघोषाचा नारा असल्याने देशभक्तीचे वातावरण निर्मीती झाल्याचे दिसुन आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com